आता वाढू लागला कोरोनामुक्तीचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST2020-10-07T05:00:00+5:302020-10-07T05:00:07+5:30

मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये खुटाळा चंद्रपूर येथील ६३ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला ३ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू घुटकाळा येथील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. बाधिताला २ ऑक्टोबरला भरती करण्यात आले होते. तिसरा मृत्यू चंद्रपुरातील लक्ष्मीनगर येथील पुरूष बाधिताचा झाला आहे.

The speed of corona free now increasing | आता वाढू लागला कोरोनामुक्तीचा वेग

आता वाढू लागला कोरोनामुक्तीचा वेग

ठळक मुद्देनवे रूग्ण १८८ : २४ तासात तिघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १८८ बाधित पुढे आल्याने एकूण बाधितांची संख्या ११ हजार ३०६ झाल आहे. उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही आता झपाट्याने वाढत असल्याचे पुढे आहे. आतापर्यंत ७ हजार ८८३ बाधितांना सुटी देण्यात आली. २४ तासात तिघांचा मृत्यू झाला तर नवे १८८ पॉझिटिव्ह आढळले. बाधितांची संख्या ३ हजार २४६ झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत मृतकांची संख्या १७७ झाली आहे.
मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये खुटाळा चंद्रपूर येथील ६३ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला ३ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू घुटकाळा येथील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. बाधिताला २ ऑक्टोबरला भरती करण्यात आले होते. तिसरा मृत्यू चंद्रपुरातील लक्ष्मीनगर येथील पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला १ ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. दुसºया व तिसºया बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब, न्युमोनियाचा आजार होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण
जिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्र्रपूर शहर व परिसरातील ७६, पोंभूर्णा तालुका एक, बल्लारपूर १७, चिमूर चार, मूल आठ, गोंडपिपरी एक, कोरपना १०, ब्रह्मपुरी तालुका ११, नागभीड २६, वरोरा १०, भद्रावती ९, सावली एक, राजुरा आठ, गडचिरोली, गोंदिया व तेलंगणा येथील प्रत्येकी दोन असे एकूण १८८ बाधितांचा समावेश आहे. १७७ बाधित मृतकांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात १६८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

Web Title: The speed of corona free now increasing