कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावल्यास प्रशासनात गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:44+5:30

कर्मचारी हा प्रशासनाचा कणा आहे. चांगले कर्तव्यदक्ष कर्मचारी विकासकामांना गती प्राप्त करून देत असतात. कर्मचाºयांनी स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास प्रशासनात चैतन्य फुलते, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले.

Speed up administration if employees perform their duties | कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावल्यास प्रशासनात गती

कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावल्यास प्रशासनात गती

Next
ठळक मुद्देसंध्या गुरनुले : पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : कर्मचारी हा प्रशासनाचा कणा आहे. चांगले कर्तव्यदक्ष कर्मचारी विकासकामांना गती प्राप्त करून देत असतात. कर्मचाºयांनी स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास प्रशासनात चैतन्य फुलते, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले.
पं. स. अंतर्गत तालुकास्तरीय कर्मचारी आनंदोत्सव सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, विनोद देशमुख, गंगाधर मडावी, नगराध्यक्षा श्वेता वनकर, उपनगराध्यक्ष रजिया कुरेशी, भाजपा तालुकाध्यक्ष गजाजन गोरंटीवार, पं. स. संवर्ग विकास अधिकारी साळवे उपस्थित होते.
पोंभुर्णा तालुक्यात विकासाच्या योजना राबविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी यावेळी दिली.

सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे योजनांना गती
पोंभुर्णा तालुका विकासापासून वंचित होता. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक योजना आणल्या. पायाभूत विकासकामे करतानाच मोठ्या प्रकल्पांची उभारणी केली. आजही ते विकासाला गती देत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकासाकडे लक्ष देण्याच्या सूचना जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी दिल्या.

Web Title: Speed up administration if employees perform their duties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.