शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

डायरेक्ट पॅडीसिडरद्वारे चिखलावर धान पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

डायरेक्ट पॅडीसीडर वापरताना रोपवाटीका तयार करण्याची गरज नाही. चिखलणी केल्यानंतर एक दिवस चिखल जमु द्यायचे व त्यानंतर त्यात सरळ अंकुरीत धान पेरणी करता येते. उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे व्यवस्थापन करता येते. ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करण्यास अडचणी येत नाही. डायरेक्ट पॅडीसिडरमुळे मजुरांवरील खर्च कमी होतो.

ठळक मुद्दे लागवड खर्चात होणार बचत : हत्तीबोडी येथील अर्ध्या एकर शेतीत प्रयोग

सुरेश कोमावार ।लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : भात पिकाचा लागवड खर्च व मजुरीत काटकसर करण्यासाठी सिंदेवाही येथील कृषी संशोधन केद्र अंतर्गत डायरेक्ट पॅडीसीडर यंत्राचे सहाय्याने चेक हत्तीबोडी येथील शेतकरी आनंदराव बावणे यांनी अर्ध्या एकर शेतीत हा प्रयोग केला आहे.भात रोवणी करण्यासाठी पोंभुर्णाचे तालुका कृषी अधिकारी व अन्न सुरक्षा दलाच्या प्रशिक्षकांनी संजीवनी कृषी सप्ताह कार्यक्रमातून या नाविण्यपूर्ण प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांना दिली.डायरेक्ट पॅडीसीडर वापरताना रोपवाटीका तयार करण्याची गरज नाही. चिखलणी केल्यानंतर एक दिवस चिखल जमु द्यायचे व त्यानंतर त्यात सरळ अंकुरीत धान पेरणी करता येते. उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे व्यवस्थापन करता येते. ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करण्यास अडचणी येत नाही. डायरेक्ट पॅडीसिडरमुळे मजुरांवरील खर्च कमी होतो. रोवणीकरीता रोपे तयार करणे, रोपे काढणे, मुख्य शेतात पसरविणे व रोवणी करणे इत्यादी कामावरील हेक्टरी ६ हजार ३०० रूपयांची बचत होते.हेक्टरी बियाणे व विरळणीचे खर्चही कमी होतो. रोवणी केलेल्या धानापेक्षा डायरेक्ट पॅडीसिडरणे पेरणी केलेले पीक ७ ते १० दिवस लवकर परिपक्व होवून लवकर काढणीला येतो. यावेळी पंचायत समिति सभापती अलका आत्राम, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप बारामते, प्रशिक्षणार्थी गुणवंत मोरे, मुन्ना लोणारे, प्रशांत कावटकर, प्रगतशील शेतकरी सुनील निमसरकार उपस्थित होते.दिवसभरात एक हेक्टर रोवणीडायरेक्ट पॅडीसिडर वजनाने हलके असल्यामुळे हाताळणी करण्यास सोपे असते. एक दिवसात एक हेक्टर क्षेत्र पेरणी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. चेक हत्तीबोडी येथील शेतकरी आनंदराव बावणे यांच्या शेतातहा प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या यंत्राबाबत माहिती घेणे सुरू केले आहे.डायरेक्ट पॅडीसिडर यंत्राच्या सहाय्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च खूपच कमी येतो. पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा वाढविता येईल, यादृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.- शहाजी शिंदे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, पोंभुर्णा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी