शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार नसल्याने सहा हजार मजुरांचे हात रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

२३ मार्चपासून बांधकामाशी निगडीत कामे बंद करण्यात आली. २२ एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले. पण, नियमांच्या धास्तीने बांधकाम बंद आहेत. शहरातील मजुरांच्या दृष्टीने येथील बुधवारच्या आठवडी बाजाराचे अत्यंत महत्त्व आहे. पण वस्तु विकत घ्यायला पैसा नाही. कामच नाही तर कंत्राटदाराला पैसे मागायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देबांधकाम कामगारांची व्यथा : लॉकडाऊनच्या नियमांमुळे इमातींचे बांधकामे ठप्प

सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. सोशल डिस्टन्सच्या सूचना असल्याने अनेकांनी अद्याप कामे सुरू केली नाही. त्यामुळे जगायचे कसे या विवंचनेत असणाऱ्या शहरातील सुमारे सहा हजार मजुरांचे हाल होत आहेत.२३ मार्चपासून बांधकामाशी निगडीत कामे बंद करण्यात आली. २२ एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले. पण, नियमांच्या धास्तीने बांधकाम बंद आहेत. शहरातील मजुरांच्या दृष्टीने येथील बुधवारच्या आठवडी बाजाराचे अत्यंत महत्त्व आहे. पण वस्तु विकत घ्यायला पैसा नाही. कामच नाही तर कंत्राटदाराला पैसे मागायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. घरात भाजीपाला, तिखट-मीट नाही, अशी परिस्थिती आहे. रेशन दुकानात धान्य आहे पण ते घेण्यासाठी पैसे नाही. काही मजुरांना कंत्राटदारांनी मदत केली. नंतर मात्र आम्हाला काम द्यावे, अशी मजुरांची मागणी होती. ज्या कंत्राटदारांनी मदत केली नाही त्या मजुरांची स्थिती तर अधिकच बिकट होती. बांधकाम व्यवसायातील गवंडी, टाईल्स लावणारे, इलेक्ट्रीक फिटींग व नळ फिटींग करणारे, वेल्डींग, सुतार, पेटींग काम करणाऱ्या मजुरांची परिस्थितीही वाईट आहे. शहरात सुमारे सात ते आठ हजार मजूर आर्थिक विवंचनेत आहेत.उधारीवरचे जगणेघरी पैसे नसल्याने मुलांच्या गरजा कशा भागवायच्या. इकडून तिकडून उधारीने पैसे मागून दिवस ढकलणे सुरू आहे, अशी व्यथा सुरक्षा नगर येथील ललिता लांबोळे यांनी मांडली. निराधार असूनही बँकेत पैसे जमा झाले नाही, अशी खंत उषा खोबरे यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे शहरातील मजुरांच्या जगण्याचे प्रश्न अधिकाधिक गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम सुरू झाले तरच त्यांच्या हाताला काम मिळू शकेल.कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मजुरांची परिस्थिती हलाखीची आहे. बांधकाम साहित्याचे भाव वाढले. याचा व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. साहजिकच मजुरांना काम नसल्याने सरकारने मदत केली पाहिजे.- सुनील पोटदुखे, बांधकाम व्यावसायिक, भद्रावती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या