चंद्रपुरात सिरो सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:58+5:30

कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. परजिल्हा व परप्रांतातून शहरात आल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. त्यानुसार मनपा आरोग्य पथकाने शंकुतला लॉनमध्ये केंद्र सुरू केले. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. संस्थात्मक विलगीकरण केंद्रांची निर्मिती केली.

Siro survey in Chandrapur | चंद्रपुरात सिरो सर्वेक्षण

चंद्रपुरात सिरो सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देमनपाकडून तयारी : अँटिबॉडी झाल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी कोणत्या वार्डातील किती लोकांमध्ये अ‍ॅन्टिबॉडी तयार झाली, हे तपासून पाहण्यासाठी चंद्रपूर शहरात लवकरच सिरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणातंर्गत सर्व वॉर्डातून किती लोकांच्या रक्ताचे नुमने घ्यायचे, यासाठी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यासाठी मनपा आरोग्य प्रशासनाकडून नियोजन केल्या जात आहे.
कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. परजिल्हा व परप्रांतातून शहरात आल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. त्यानुसार मनपा आरोग्य पथकाने शंकुतला लॉनमध्ये केंद्र सुरू केले. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. संस्थात्मक विलगीकरण केंद्रांची निर्मिती केली.
मागील महिन्यात शहरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षणही करण्यात आले. मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये दररोज शेकडो रूग्णांची तपासणी आजही सुरूच आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळ्ल्याने मनपाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्याप्ती वाढविली.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अ‍ॅन्टिबॉडी सर्वेक्षणाला आजपासून सुरू झाली. अशा प्रकारचे सर्वेक्षण चंद्रपूर महानगरात घेण्यात येणार आहे. मनपा आरोग्य अधिकाऱ्यांच्यार नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल. प्रत्येक पथकात २ डॉक्टर, १ लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट व आरोग्य कर्मचाºयांचा समावेश राहण्याची शक्यता आहे. सिरो सर्वेक्षणासाठी मनपा विशेष बसेसची व्यवस्था करावी लागणार आहे. किमान पाच दिवस चालणाºया या सर्वेक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा आरोग्य यंत्रणा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. सर्वेक्षणात प्रत्येक वार्डातून किमान २० ते ३० रक्ताचे नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासले जातील.
त्याकरिताही एक विशेष पथक कार्यरत राहणार आहे. लोकांच्या रक्ताची तपासणी करून कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी किती अँन्टिबॉडी तयार झाल्या आहेत, याची माहिती पुढे येईल. त्यानंतर उपलब्ध नमुन्यांच्या माहितीचे विश्लेषण करण्याची जबाबदारी औषधशास्त्र विभागाच्या तज्ज्ञ पथकाकडे सोपविण्यात येणार आहे.

रॅण्डम पद्धतीचा वापर
चंद्रपूर शहरातील किती लोकांच्या रक्ताची तपासणी होणार हे अद्याप निश्चित झाले नाही. मात्र, तपासणी कुणाची करायची हे रॅण्डम पद्धतीने म्हणजे नमुना निवड पद्धतीने ठरणार आहे. प्रत्येक वार्डातील लोकसंख्येनुसार चिठ्ठ्या टाकून आधी संबंधित वार्डाची निवड केली जाईल. त्यानंतर त्याठिकाणी प्रत्येकी १० घरानंतर एका घरातील एका व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अ‍ॅन्टिबॉडी सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यासाठी विशेष वैद्यकीय पथकाची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जाणार आहे. चंद्रपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर संपूर्ण तयारीनिशी सिरो सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे.
- डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी, मनपा,चंद्रपूर

क्वारंटाईनपासून सुटका
सिरो सर्वेक्षणात रक्त नमुने घेतलेल्या व्यक्तीला गृह विलगीकरण क्वारंटाईन केले जाणार नाही. अशा प्रकारचे सर्वेक्षण देशाची राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित व्यक्तींना क्वारंटाईन केले नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील मोठ्या महानगरात असे सर्वेक्षण होणार असल्याने चंद्रपूर मनपानेही तयारी सुरू केली आहे.
 

Web Title: Siro survey in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.