शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

१९ लाखांवर नागरिकांची सिकलसेल तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

सिकलसेल कार्यक्रमांतर्गत ते २० वर्ष वयोगटातील मुलामुलींची, गर्भवती मातांची तपासणी करण्यात येते. तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकांना सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हिच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे.

ठळक मुद्दे२ हजार ७०१ रुग्ण : जनजागृतीसाठी जिल्हा रुग्णालयात पोस्टर प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आरोग्य प्रशासनाने यावर्षी जिल्ह्यात १९ लाख ८५ हजार २०४ जणांची सिकलसेल तपासणी केली आहे. यामध्ये २ हजार ७०२ जण सिकलसेल रुग्ण, तर ३१ हजार ७३१ व्यक्ती सिकलसेलचे वाहन आढळून आले आहेत.सिकलसेल कार्यक्रमांतर्गत ते २० वर्ष वयोगटातील मुलामुलींची, गर्भवती मातांची तपासणी करण्यात येते. तपासणीमध्ये सकारात्मक चाचणी आल्यास त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येते. या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकांना सिकलसेल आजाराची माहिती व सिकलसेल रुग्णांना या आजाराची जाणीव होणे हिच खरी सिकलसेल रुग्णांसाठी औषध आहे. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गावागावात जनजागृती करून शासकीय आरोग्य संस्थेत मोफत सिकलसेल चाचणी केली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त सिकलसेल रुग्णांच्या व्यथा व अपेक्षा या विषयावर पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, अधिपरिचारीका माया आत्राम, प्राचार्य कळसंगे, उपअभियंता नीलेश खाडे, धीरज कासर्लेवार, संतोष चात्रेशवार, भारती तितरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडील जबाबदार असतात. परंतु या आजाराच्या नियंत्रणांकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकलसेल तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. यामुळे पुढील पिढीत हा आजार टाळता येतो.अशी घ्या काळजीवाहक व्यक्ती तसेच वाहक- ग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करु नये. सिकलसेल रुग्णांमध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजारी पडणे, जंतुसंसर्ग होणे, अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी पिणे, भरपूर आहार घेणे व नियमित फोलिक अ‍ॅसिड गोळ्यांचे सेवन करणे महत्वाचे आहे. या आजाराच्या रुग्णांनी योग्य काळजी न घेतल्यास आजारी पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते.

टॅग्स :Healthआरोग्य