शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आजारी विद्यार्थ्यांला सुटी नाकारली

By admin | Updated: April 1, 2015 01:21 IST

शिस्तीचा संबंध आरोग्यासोबत जोडल्याने वरोरा येथील सेंट अ‍ॅनिस पब्लिक स्कूल येथील एका विद्यार्थ्यांला गंभीर आजाराला सामोरे जावे लागले.

चंद्रपूर : शिस्तीचा संबंध आरोग्यासोबत जोडल्याने वरोरा येथील सेंट अ‍ॅनिस पब्लिक स्कूल येथील एका विद्यार्थ्यांला गंभीर आजाराला सामोरे जावे लागले. त्यामुळे पालक अरुण उमरे यांनी प्राचार्य ब्लेसी पीटर यांना केंद्र सरकारचा आरटीई अ‍ॅक्ट आणि शिस्त याबाबत अवगत करण्याची मागणी एका निवेदनातून चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे. वरोरा येथील मोकाशी ले-आऊट मधील भैरव अरुण उमरे हा विद्यार्थी सेंट अ‍ॅनिस पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पाचवी (ब) मध्ये शिकत आहे. त्याची अंतिम परीक्षा २६ मार्चपासून सुरू झाली. त्याने परीक्षेचा पहिला पेपर दिला. परंतु अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर डॉक्टरांकडे औषधोपचार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याची आई शारदा उमरे भैरवला सुटी मिळावी, यासाठी शाळेत गेल्या. शाळेच्या प्रिन्सीपल ब्लेसी पीटर यांना आईने भैरवला उलटी, हगवण आणि तापाचा त्रास असल्याने सांगितले. परंतु प्रिन्सीपल ब्लेसी पीटर यांनी भैरवला सुटी न देता पेपर देण्याचे फर्मान सोडले. वेळेवर परीक्षा घेणे ही आमच्या शाळेची शिस्त आहे, हेही सांगायला विसरल्या नाहीत, असे पालक अरुण उमरे यांनी निवेदनात म्हटले आहे.प्रकृतीच्या कारणाने माझ्या मुलाची पेपर सोडविण्याची मानसिकता नसतानाही त्याला पेपर सोडवायला लावल्यामुळे त्याची तब्येत पुन्हा बिघडली. पेपर सोडवित असताना शोचास आणि उलटीचा त्रास वाढला. त्यानंतर त्याला दोनवेळा उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखविण्यात आले. परंतु त्याच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यामुळे लगेच त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रिन्सीपल ब्लेसी पीटर यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेतल्यामुळे हा गंभीर प्रकार घडला, असा आरोप अरूण उमरे यांनी निवेदनातून केला आहे. माझ्या मुलाच्या बाबतीत जो गंभीर प्रकार घडला, तो इतरांच्या बाबतीत घडू नये, तसेच शिस्तीचा संबंध आरोग्याशी जोडू नये, यासाठी वरोरा येथील सेंट अ‍ॅनिस पब्लिक स्कूलच्या प्रिन्सीपल ब्लेसी पीटर यांना शिस्त आणि आरटीई अ‍ॅक्टबाबत अवगत करावे, अशी मागणी पालक अरुण उमरे यांनी निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)