शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ शिक्षिका व मुख्याध्यापिका फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2017 00:41 IST

विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत खोडतोड करून त्याला नापास करणे व इमारत फंडसाठी दोन लाख रुपयांची मागणी करणे, ..

माऊंटमधील उत्तरपत्रिका खोडतोड प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत खोडतोड करून त्याला नापास करणे व इमारत फंडसाठी दोन लाख रुपयांची मागणी करणे, या प्रकरणात गुन्हे दाखल असलेली माऊंट कार्मेल कान्व्हेंट हॉयस्कूल मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिका पोलिसांच्या लेखी फरारच असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित विद्यार्थ्याचे वडील राजेश ठाकूर यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली होती. त्यांचा मुलगा मागील सत्रात इयत्ता नववीत शिकत होता. या विद्यार्थ्याने इयत्ता नवव्या वर्गाची परीक्षा दिली. तत्पूर्वी त्याने वर्गशिक्षिका सना सागर खत्री यांच्याकडे एसएसटी या विषयाची ट्युशन लावली होती. मात्र काही कारणामुळे या विद्यार्थ्याने मध्येच या शिक्षिकेकडून ट्युशन बंद केली. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला वर्गात त्रास देणे सुरू केले. त्यानंतर प्रि-बोर्ड -२ च्या परीक्षेत विद्यार्थ्याला एसएसटी विषयात नापास करण्यात आले होते. त्यांनी ही बाब शाळेच्या मुख्याध्यापिका नित्या जोसेफ यांच्या लक्षात आणून दिली होती. मात्र त्यांनी ठाकूर यांना न्याय देण्याऐवजी शाळेच्या इमारतीसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. ठाकूर यांनी हा नियमबाह्य इमारत फंड देण्यास नकार दिला. त्यानंतर ठाकूर यांच्या मुलाला नवव्या वर्गाच्या शेवटच्या परीक्षेत अनुत्तिर्ण करण्यात आले. माहिती अधिकारात त्यांनी उत्तरपत्रिका मागितली असता त्यात गुणांकनामध्ये खोडतोड केल्याचे ठाकूर यांना लक्षात आले. लगेच त्यांनी सीबीएसई बोर्ड, शिक्षणाधिकारी व पोलिसात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिका यांच्याविरुध्द भादंवी कलम ४६८, ४७१, ४२० (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या दोघींचाही शोध घेत आहेत.गुणवत्तेसाठीही घडला होता असाच प्रकारदहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून कमी हुशार विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून पाल्याची टीसी घेऊन जाण्याचा फतवाही या शाळेने काही दिवसांपूर्वी काढला होता. मध्येच टीसी घेऊन पाल्यांना कोणत्या शाळेत प्रवेशित करावे, असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला होता. नंतर पालकांनी याबाबत शाळा व्यवस्थापनाविरोधात आवाज उठविल्यानंतर हा फतवा मागे घेण्यात आला होता.