शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ शासकीय निवासस्थान बनले ‘शेळीपालन’ केंद्र

By admin | Updated: July 12, 2017 00:48 IST

शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून कार्यक्षेत्रामध्ये सेवा देता यावी, म्हणून ग्रामीण भागात शासकीय निवासस्थाने बांधून दिली.

गेवरा येथील प्रकार : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून कार्यक्षेत्रामध्ये सेवा देता यावी, म्हणून ग्रामीण भागात शासकीय निवासस्थाने बांधून दिली. चंद्रपूर वन विभागातील सावली वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या पाथरी उपक्षेत्रातील गेवरा बिटाकरिता वनरक्षकाचे गेवरा बुज येथे एक निवासस्थान बांधल्या गेले. मात्र मागील वर्षी येथील वनरक्षकाची बदली झाली. तरीसुद्धा सदर वनरक्षकाने निवसस्थान सोडले नाही. व त्याठिकाणी आपले बकरी पालण केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे शासकीय निवासस्थानाला बकरीपालन केंद्राचे रुप प्राप्त झाले आहे. कर्तव्यात असलेल्या वनरक्षकाला स्थानिक मुख्यालयात राहून प्रशासकीय सेवा देता यावी, हा प्रमुख उद्देश पुढे ठेवून निवासस्थानाची शासकीय व्यवस्था करण्यात आली. मात्र मागील वर्षीपासून या बिटात नव्याने रूजू झालेल्या वनरक्षकाऐवजी तत्कालीन वनरक्षकाने सदर निवास्थान न सोडता, त्याच ठिकाणी आपल्या निवासस्थानासह बकरी पालन केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे सेवारत वनरक्षकाला किरायच्या खोलीत राहुन वनविभागाची सेवा करावी लागत आहे. मात्र या बाबीकडे वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासकीय निवासस्थानाचा उपयोग खासगी बकरी पालनासाठी केला जात आहे.गेवरा बिट वनरक्षकाकडे कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्या निवासस्थानावर बकऱ्यांचे निवासस्थान दिसत असल्यामुळे शासकीय निवासस्थान बकरीपालन केंद्र असल्याचा अनुभव येत आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकारी व उपवनसंरक्षक चंद्रपूर यांना अनेकदा दिली. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांने अप्रत्यक्षरित्या शासकीय निवासस्थानातील बकरीपालन केंद्राला मान्यताच दिली असल्याचा संशय परिसरातील नागरिक व्यक्त करित आहेत.