शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या सतर्कतेने सात क्विंटल धान्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने यावर खबरदारी म्हणून मागील २१ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गरीब, मजूर वर्गातील नागरिकांचे काम बंद आहेत. त्यामुळे शासनाने दारिद्रय रेषेखालील व अंतोदय गटातील नागरिकांसाठी शासनाने रेशन दुकानात सवलतीच्या दराने व प्रधानमंत्री योजनेतील प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जात आहे.

ठळक मुद्देवाहानगाव येथील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : देशात लॉकडाऊन असल्याने गरीब नागरिकांना शासनातर्फे मोफत व स्वस्तदरात धान्य देण्यात येत आहे. परंतु स्वस्त धान्य दुकानदार आपल्या हक्काच्या धान्याची अफरातफर करीत असल्याबाबत तक्रार देऊनही अधिकारी लक्ष देत नसल्याचे बघून गावकऱ्यांनी एकमत करीत आपणच आपल्या धान्याचे रक्षक बनत वाहानगाव येथील स्वस्त दुकानातील सात क्विंटल तांदूळ चोरून वाहतूक करणाºया वाहनासह पकडून दिले. गावकरिच रक्षक बनल्याचा प्रसंग सोमवारी सकाळी उजेडात आला.देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने यावर खबरदारी म्हणून मागील २१ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गरीब, मजूर वर्गातील नागरिकांचे काम बंद आहेत. त्यामुळे शासनाने दारिद्रय रेषेखालील व अंतोदय गटातील नागरिकांसाठी शासनाने रेशन दुकानात सवलतीच्या दराने व प्रधानमंत्री योजनेतील प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जात आहे. मात्र वाहानगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या निर्देशानुसार धान्य न देता कमी देत असल्याची तक्रार ग्रामपंचायत व काही गावकऱ्यांनी तहसिलदारांकडे केली होती. अधिकाºयांनी नागरिकांच्या तक्रारीला गंभीरतेने घेतले नाही व चौकशीचा फार्स केला. दुकानदाराला गरिबांचे धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी संधी दिल्याचा आरोप नागरिकांनी शुक्रवारी केला होता. तीन दिवसापूर्वी वाहानगाव येथील नागरिकांनी सरकारी स्वस्त धान्य दूकानदार ग्राहकांची लूट करीत असल्याने चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी तक्रार केली होती. परंतु अधिकाºयांकडून दाद मिळाली नाही . शेवटी झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात येथील उपसरपंच तथा मनसे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत कोल्हे, गावातील सहकारी सुधाकर दडमल, तंमुस अध्यक्ष गजानन गायकवाड, बंडूजी भोयर यांच्या सहकार्याने सावरी या गावामधून माललंपास करून पिकअप वाहनाने भरधाव वेगाने गाडी जात असताना पाठलाग करून चोरीचे धान्य पकडून शेगांव पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर घटनेची माहिती चिमूरचे तहसिलदार संजय नागटिळक व शेगावचे ठाणेदार एस. पी. बोरकुटे यांना देण्यात आली असता तहसिलदारांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी तांदळाच्या १४ कट्ट्यांसह गाडी शेगाव पोलीस ठाण्यात जमा करून कारवाही सुरू केली. वृत्त लिहेपर्यत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक