शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

१४ रुग्णांना कोविड केअर सेंटर तर, एक पॉझिटीव्ह १६ व १७ मे रोजी झालेल्या चाचणीनंतर निगेटिव्ह आल्यामुळे संक्रमित आलेल्या रूग्णांमधून कमी करण्यात आले. चंद्रपुरातील दुसरा रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २१ आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

ठळक मुद्देआयसोलेशमध्ये २० रूग्ण : ५६ हजार जणांचे गृह विलगीकरण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत कोविड-१९ संक्रमित रूग्णांची संख्या २२ होती. ७ रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. १४ रुग्णांना कोविड केअर सेंटर तर, एक पॉझिटीव्ह १६ व १७ मे रोजी झालेल्या चाचणीनंतर निगेटिव्ह आल्यामुळे संक्रमित आलेल्या रूग्णांमधून कमी करण्यात आले. चंद्रपुरातील दुसरा रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २१ आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्यात कोविड-१९ संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन १४ दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. आयएलआय,सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. कोविड-१९ संक्रमित २२ रूग्णांची जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली १, मुंबई ३, ठाणे २, पुणे- ६, यवतमाळ २ नाशिक ३ कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत ५ आहेत. संशयित रूग्णांचे आवश्यकतेनुसार तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.जिल्ह्यात ११ कंटेनमेंट झोनसध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात ८ व महानगरपालिका क्षेत्रात ३ असे एकूण ११ कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आले आहेत. या झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या १०३ व कमी जोखमीच्या संपर्कातील ९४ अशा एकूण १९७ संपर्कातील व्यक्तींची नोंद घेण्यात आली. १०४ संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या