आठ ग्रामपंचायतीत सरपंचपद आरक्षणाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:34+5:302021-02-05T07:33:34+5:30

सावली तालुक्यात एकूण ५४ ग्रामपंचायती आहेत. त्यात सरपंचपदाची सोडत २९ व ३० तारखेला काढण्यात आली. यामध्ये सहा ग्रामपंचायतींचे सरपंचपद ...

Sarpanchpada reservation in eight gram panchayats | आठ ग्रामपंचायतीत सरपंचपद आरक्षणाचा तिढा

आठ ग्रामपंचायतीत सरपंचपद आरक्षणाचा तिढा

सावली तालुक्यात एकूण ५४ ग्रामपंचायती आहेत. त्यात सरपंचपदाची सोडत २९ व ३० तारखेला काढण्यात आली. यामध्ये सहा ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीकरिता सहा, तर आठ ग्रामपंचायतीचे सरपंचपद जमातीकरिता राखीव झाले आहेत. त्यापैकी आठ गावांतील सरपंच पदाकरिता आरक्षण असलेला सदस्यच नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहण्याची शक्यता आहे. यामध्ये पारडी व मेहा बुज. ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला, लोंढोली, साखरी, बेलगाव व जीबगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला, तर अनुसूचित जमातीसाठी व्याहाड बुज. व वाघोली बुटी. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. मात्र या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेल्या प्रवर्गाचे सदस्यच नसल्याची बाब पुढे आली आहे. सदस्य नसताना संबंधित प्रवर्गासाठी सरपंचपदाची सोडत कशी काढण्यात आली, अशा सवाल उपस्थित होत आहे.

ठरल्याप्रमाणे आरक्षणानुसारच सरपंचपदाची निवडणूक होईल. पद रिक्त राहिल्यास तशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळवून आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.

- सागर कांबळे, नायब तहसीलदार, सावली.

Web Title: Sarpanchpada reservation in eight gram panchayats