शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करांकडून २१ लाखांवर दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

यावर्षी जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही व्हायचा आहे. तरीही काही वाहनमालक रेतीची तस्करी करून गरजुंकडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या तस्करांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याने नदी-नाल्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर तहसीलदारांची कारवाई : तस्करांवर लक्ष ठेवण्यासाठी निगरानी पथकाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रेतीच्या अवैध तस्करी प्रकरणी चंद्रपूर तहसीलदारांनी धडक कारवाई सुरू केली असून मागील काही दिवसांमध्ये विविध २२ वाहनांवर कारवाई करीत या वाहनांच्या मालकांकडून तब्बल २१ लाख ६८ हजारांचा दंड वसुल केला आहे. या कारवाहीमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे, या तस्करांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निगरानी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.यावर्षी जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही व्हायचा आहे. तरीही काही वाहनमालक रेतीची तस्करी करून गरजुंकडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या तस्करांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याने नदी-नाल्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. यावर आळा घालण्यासाठी नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार निलेश गौंड यांनी कारवाई करणे सुरु केले आहे. यासाठी त्यांनी नायब तहसीलदार, मंडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निगरानी पथकाची निर्मिती केली आहे. सदर पथक दिवसरात्र या तस्करांवर लक्ष ठेवून आहेत. याचाच परिणाम म्हणून मागील महिनाभरात रेती तस्करी करणारे २२ वाहने जप्त करण्यात आले असून त्यांच्या मालकांकडून दंड वसुल करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संदीप रॉय, प्रल्हाद कामडी रा. कोसारा, वाहन चालक सागर मोहन मोहरे रा. पडोली यांच्यासह ५ मजुरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निलेश गौंड, अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंधक पथक प्रमुख राजू धांडे, तलाठी प्रकाश सुर्वे, प्रविण वरभे, रवींद्र तल्हार, राहूल भोंगळे, शैलेश दुव्वावार, दिलीप पिल्लई, अनवर शेख, विशाल कुºहेवार आदींनी केली.जप्त केलेले ट्रॅक्टर पळविणे भोवलेरेती तस्करी प्रकरणी जप्त केलेला ट्रॅक्टर चंद्रपूर तहसील कार्यालय परिसरातून पळविणे चाांगलेच भोवले असून आरोपींवर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोसारा नदीतून ट्रक्टरद्वारे रेतीची तस्करी करताना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ट्रॅ्क्टर जप्त करून तहसील कार्यालयात ठेवला होता. सदर ट्रॅक्टर आणि ट्रालीवर नंबर नव्हता. हिच संधी साधत तहसील कार्यालयातू ट्रॅक्टर तसेच ट्राली पळवून नेण्यात आली. यासंदर्भात तहसीलदारांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रार द्या, कारवाई करूरेतीची तस्करी करून वाहतूक करणाºयांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. रेतीची तस्करी करताना आढळल्यास तहसील कार्यालयात तक्रार द्या, तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने कण्यात आले आहे.रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी निगरानी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर पथकाद्वारे तपासणी करण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीत रेतीची तस्करी होणार नाही यासाठी प्रयत्न सुरु आहे. यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे. रेती तस्करासंबंधी तक्रार असल्यास तहसील प्रशासनाला कळवावे.- निलेश गौंड, तहसीलदार, चंद्रपूर

टॅग्स :sandवाळू