शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यमुळे वाघांचा भ्रमणमार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

तेलंगणातील कवल, इंद्रावती, टिपेश्वर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा कन्हाळगाव व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या मार्गाने वाघांची भ्रमंती सूरू असते. कन्हाळगाव अभयार अंतर्गत कोठारी, तोहोगाव, कन्हाळगाव, धाबा वनक्षेत्राचा समावेश आहे. अभयारण्य घोषित झाल्याने  व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडणार, असा दावा वन अधिकारी करीत आहेत.  राज्याचे माजी वनमंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने कन्हाळगाव अभयारण्याला १३ व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता  प्रदान करण्यात आली होती.

ठळक मुद्दे कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने विभागाचा दावा

  निलेश झाडे / प्रमोद येरावार    लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : जिल्ह्यातील दक्षिणेकडील कन्हाळगाव हा सुरक्षित व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार, असा दावा पयार्वरणवाद्यांकडून केला जात आहे.  विशेष म्हणजे या अभयारण्याला सूरवातीपासूनच काही गावांचा विरोध होता. अभयारण्य घोषित झाल्याने पारंपरिक वन हक्कांवर गदा आणू नका, अशी मागणी करू लागले आहेत.तेलंगणातील कवल, इंद्रावती, टिपेश्वर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा कन्हाळगाव व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या मार्गाने वाघांची भ्रमंती सूरू असते. कन्हाळगाव अभयार अंतर्गत कोठारी, तोहोगाव, कन्हाळगाव, धाबा वनक्षेत्राचा समावेश आहे. अभयारण्य घोषित झाल्याने  व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडणार, असा दावा वन अधिकारी करीत आहेत.  राज्याचे माजी वनमंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने कन्हाळगाव अभयारण्याला १३ व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता  प्रदान करण्यात आली होती.

अशा आहेत ग्रामस्थांच्या  विविध मागण्या  प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला अभयारण्यात रोजगार द्यावा, निस्तार हक्कांची गरज पूर्ण करावी, जंगलावरील गावाचा हक्क कायम ठेवावा, तेंदुपता संकलन हंगाम बंद करू नये, वन्यजीवापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी, स्थानिकांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी.

नागरिकांचा सुरूवातीपासूनच विरोध कन्हाळगाव अभयारण्याला नागरिकांचा सुरवातीपासूनच विरोध होता. त्यात काही राजकीय नेत्यांनी अभयारण्याचा विषयाला हात घातल्याने विरोध अधिक तीव्र झाला होता. अभयारण्याबाबत नागरिकांची मते घेण्यासाठी १८ ग्रामपंचायती व गट ग्रामपंचाय अंगर्तत ३३ गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या. या ग्रामसभांमध्ये नागरिकांनी प्रस्तावित अभयारण्याच्या विरोधात मते मांडली होती.  

टॅग्स :Tigerवाघ