कंत्राटी कामगारांना १५०० रूपयांची वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:01:20+5:30

सूर्योदय ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत १२० कामगार व कार्यालय कर्मचारी मिळून २०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे महिन्याला तीन लाखांचा अतिरिक्त द्यावा लागेल. कामगारांचे वेतन सुरूवातीला १५ हजार रूपये होते. ते आता १६ हजार ५०० रूपये झाले आहे. कामगाऱ्यांच्या आंदोलनामुळे वेकोलि प्रशासन आणि ट्रान्सपोर्ट कंपनी नमली. कंपनीने वेतनाबाबत यापुढे अन्यायकारक निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Salary increase of Rs. 1500 for contract workers | कंत्राटी कामगारांना १५०० रूपयांची वेतनवाढ

कंत्राटी कामगारांना १५०० रूपयांची वेतनवाढ

ठळक मुद्देआंदोलनानंतर कंपनी नमली : वेकोलिचे कोळसा वाहतूक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ‘समान वेतन समान काम’ हा आदेश धाब्यावरून बसवून वेतनवाढ नाकारल्याने वेकोलि कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. वेकोलि प्रशासन व सूर्योदय ट्रान्सपोर्ट कंपनीने कामगारांच्या बेसिकमध्ये प्रतिदिन ५० रूपयेप्रमाणे मासिक वेतनात दीड हजारांची वेतनवाढ केल्यामुळे बुधवारी आंदोलन मागे घेण्यात आले.
सूर्योदय ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत १२० कामगार व कार्यालय कर्मचारी मिळून २०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे महिन्याला तीन लाखांचा अतिरिक्त द्यावा लागेल. कामगारांचे वेतन सुरूवातीला १५ हजार रूपये होते. ते आता १६ हजार ५०० रूपये झाले आहे. कामगाऱ्यांच्या आंदोलनामुळे वेकोलि प्रशासन आणि ट्रान्सपोर्ट कंपनी नमली. कंपनीने वेतनाबाबत यापुढे अन्यायकारक निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे वेतनवाढ लागू करण्यासाठी सूर्योदय कंपनीने तीन महिन्याची मुदत लेखी स्वरूपात दिली.
कामगारांनी वेतनाच्या प्रश्नावरून आंदोलन केल्याने दोन दिवस कामबंद होते. कोळसा भरलेले ५६ रॅक जात होते. परंतु दोन दिवसांपासून रेल्वे रॅक न गेल्याने रेल्वे प्रशासन लाखोंचा दंड ठोठावला. कोळसा वाहतूक थांबल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी वेकोलि प्रशासन व कंपनीच्या अधिकाºयांना मंगळवारी मोठी कसरत करावी लागली होती.

कामगारांमध्ये आनंद
कामगार कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात कामगारांच्या हितासाठी दिलेल्या आदेशाकडून कंपनीने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे कामगारांवर अन्याय झाला. अल्प वेतन देणे सुरू केल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. वेतनवाढ झाल्याने कामगारांनी कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.
 

Web Title: Salary increase of Rs. 1500 for contract workers