शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

संधीचे सोने करण्यास सत्ताधारी अपयशी

By admin | Updated: November 16, 2015 01:01 IST

मूल नगर परिषदेच्या स्थापनेला तब्बल २८ वर्षाचा काळ लोटत आहे. आजवर लाखो रुपयांचा निधी आला. मात्र वाढत्या भ्रष्टाचाराने मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकला नाही.

राजू गेडाम मूलमूल नगर परिषदेच्या स्थापनेला तब्बल २८ वर्षाचा काळ लोटत आहे. आजवर लाखो रुपयांचा निधी आला. मात्र वाढत्या भ्रष्टाचाराने मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकला नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात मूल शहर विकासापासून कोसोदूर राहिले. नगरपरिषदेत भाजपाची सत्ता असून केंद्र व राज्यातसुद्धा भाजपाची सत्ता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही जन्म याच तालुक्यात झााल. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. सत्तारूढ पदाधिकारी व नगरसेवकांनी नियोजनबद्ध आखणी केल्यास मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास व मूल शहर स्मार्ट सिटी होण्यास कुणीही रोखू शकत नाही. मात्र सत्तारूढ पदाधिकारी व नगरसेवकातच ‘हाडवैर’ असल्याने विकासाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. विकासाची संधी असताना संधीचे सोने करण्यास अपयश आले आहे. मूल नगरपरिषदचे स्थापना १० सप्टेंबर १९८७ ला झाली.नगर परिषदेवर प्रथमत: काँग्रेसचे वर्चस्व प्राप्त झाले. मात्र त्यांनी देखील जनतेची घोर निराशा केली. त्यानंतर नगरपरिषदेवर काँग्रेस-भाजपा अशी सत्ता बसली. मात्र पदाधिकाऱ्यांची एकवाक्यता नसल्याने विकासाचा खेळखंडोबा झाला. शहराच्या विकासापेक्षा स्वत:चा विकास करण्यास धन्यता मानली गेली. गेल्या चार वर्षापासून नगर परिषदेवर भाजपाची सत्ता आहे. क्षेत्राचे आमदार अर्थमंत्री असल्याने विकासात्मक कार्यात निधी आणण्यात कुठलीही अडचण नाही. मात्र कंत्राटदार प्रवृत्तीच्या नगरसेवकांना विकासाबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे जाणवते. विकासाचे देणेघेणे नसल्याने नियोजनबद्ध आखणी करण्यास सत्तारूढ पदाधिकारी व नगरसेवक अपयशी ठरले आहेत. सत्तारूढ भाजपाकडे १३ जणांचे स्पष्ट बहुमत आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे फक्त चार नगरसेवक आहेत. मात्र सत्तारूढ पक्षातील काही पदाधिकारी व नगरसेवकाविरुद्ध पक्षाच्या नगरसेवकांना ‘हिरवी झंडी’ दाखवीत असल्याने स्पष्ट बहुमत असतानादेखील मनात असताना देखील एखाद्या ठराव पारीत करणे कठीण जात आहे. सत्तारूढ पक्षाला ठराव पारीत करण्यासाठी तारेवरची कसरत करूनही ‘डाव’ साधता येत नसेल तर ‘सत्तारूढ’ म्हणण्यात काहीच हरकत नाही.