रोजगारासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:51+5:30

गावागावात महिला बचत गट व लघु उद्योग निर्माण झाल्यास कुटुंबाचा उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. महिलांच्या रोजगारासाठी बचतगटांची भूमिका अधिक महत्वाची असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

The role of savings groups for employment is important | रोजगारासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची

रोजगारासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची

ठळक मुद्देराहुल कर्डिले। नांदाफाटा बचत गट महिला मेळावा व प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपूर : महिलांच्या आर्थिक समक्षमीकरणासाठी रोजगाराची संधी गरजेच्या आहेत. गावागावात महिला बचत गट व लघु उद्योग निर्माण झाल्यास कुटुंबाचा उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. महिलांच्या रोजगारासाठी बचतगटांची भूमिका अधिक महत्वाची असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
अल्ट्राटेक सिमेंट कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनव्दारा नांदाफाटा येथे उल्हासउत्सव कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी ओमप्रसाद रामपत, संवर्ग विकास अधिकारी बाबाराव पाचपाटील, कंपनीचे मुख्य व्यवस्थापक विजय एकरे, अनिल पिल्लई, बी. पी. सग्गू, बंगारूबाबू रायली, श्रीदेवी रॉयली, योगेश भट्ट, कर्नल दीपक डे, रेखा ऐकरे, कुलदीप सग्गु आदी उपस्थित होते. यावेळी महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी बचत गटातर्फे तयार करण्यात आलेल्या अगरबत्ती, मसाले पदार्थ आदींचे प्रदर्शन भरवण्यात आले. संचालन अल्ट्राटेक फाऊंडेशनचे सहाय्यक प्रबंधक संजय पेटकर तर आभार, कर्नल दीपक डे यांनी मानले. यशस्वीतेसाठी असलम खान, ओमप्रकाश कोठारी, सतीश मल्लडी, साईगुरू, चंद्रावत, किशोर उरकुडे, सचिन गोवारदीपे, आदींनी प्रयत्न केले.

१२ विद्यार्थिनींना सायकलचे वितरण
अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गावातील गरीब व होतकरु १२ विद्यार्थिनींना कार्यक्रमाप्रसंगी सायकल वाटप करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थिंनीना शाळेत जाणे सोईस्कर होणार आहे.

Web Title: The role of savings groups for employment is important