शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची दुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST

ब्रह्मपुरी : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी ...

ब्रह्मपुरी : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन काळामध्ये रस्त्याचे कामे बंद होती. आता काही ठिकाणी सुरु करण्यात आली आहे. मात्र गती नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बाजारपेठेत सॅनिटायझर फवारणी करा

सिंदेवाही : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारपेठ सकाळी ७ ते ५ वाजता पर्यंत सुरू करण्यात आली असल्याने सॅनिटायझर फवारणी करणे गरजेचे आहे. मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

सावली : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. लॉकडाऊन असल्याने रस्ते ओसाड पडले आहेत. त्यामुळे रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव करुन कामाला सुरुवात करण्याची मागणी आहे.

सावरदंड चक रस्ता दुरुस्तीची मागणी

ब्रह्मपुरी : तालुक्यातील सावरदंड चक येथे जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाचे पक्के खडीकरण करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

भद्रावती तालुक्यात रानडुकरांचा हैदोस

भद्रावती : काही गावांच्या शिवारात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेल्या पिकांचे रानडुकरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रस्त्यावरील अंधार दूर करा

कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गावर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. या मार्गावर पथदिवे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर पोलीस स्थानक, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तालुका क्रीडा संकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.

रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या

कोरपना : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या रुग्णालयात उपचारासाठी कोरपना, जिवतीसह यवतमाळ जिल्ह्यातील व तेलंगणा राज्यातील रुग्ण येतात. सद्यस्थितीत रुग्णालय ३० खाटांचे आहे.

नाल्यातील गाळ काढण्याची मागणी

वरोरा : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.

बुद्धगुडा गावातील समस्या सोडवा

जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्येने ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाही. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा येथील समस्या सोडवाव्या.