कोरोनाच्या महामारीत राईसमिल संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:13+5:30

देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान पिकांवर पेटते. जयश्रीराम एचएमटी, सोनालिका, पारस, आयआर ३६ या धानाची लागवड परिसरात केली जाते.

Ricemill crisis in Corona epidemic | कोरोनाच्या महामारीत राईसमिल संकटात

कोरोनाच्या महामारीत राईसमिल संकटात

Next
ठळक मुद्देकर्जाचा डोंगर वाढला : वीज बिलाने व्यवसाय डबघाईस

रवी रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले तर राईसमिलला चांगले दिवस येतात. परंतु कोरोनाच्या महामारीत सध्या राईसमिल संकटात सापडल्या आहे. राईस मिल मालकांवर कर्जाचे डोंगर वाढत असून अवाढव्य वीज बिलाने व्यवसाय डबघाईस आला आहे.
देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान पिकांवर पेटते. जयश्रीराम एचएमटी, सोनालिका, पारस, आयआर ३६ या धानाची लागवड परिसरात केली जाते.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने राईसमिल आहेत. यापैकी ब्रम्हपुरी नागभीड, सिंदेवाही, मूल या पट्ट्यात राईस मिलची संख्या सर्वाधिक आहे. मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचे वादळ आल्याने याचा फटका राईसमिल व्यवसायाला बसला आहे. मजूर वर्गाशिवाय कोणत्याही व्यवसायाचा विकास होत नाही. कोरोनाच्या महामारीने सुरूवातीला व दरम्यानच्या काळात मजूर वर्ग बाहेर गेल्याने भात उत्पादनावर काही काळ मोठा फरक पडला. त्याचप्रमाणे शासनाने मोफत दरात मजुरवर्गांना तांदूळ, गहू दिल्यामुळे याचाही फटका या उद्योगाला बसला. कोरोनाच्या संकटात राईसमिल जीवनावश्यक वर्गात येत असल्याने सुरू होत्या. परंतु उत्पादित झालेला माल मात्र लॉकडाऊनमुळे बाहेर गेलाच नसल्याने राईसमिल मालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. राईसमिल उद्योगाचे भवितव्य उत्पादित झालेल्या मालाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेल्या आर्थिक कोंडीमुळे व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे.

कुकुस स्थिरावला, मात्र कोंढ्याचे भाव घसरले
लॉकडाऊ नच्या काळात कुकुसाला भाव होता. तो आजही कायम आहे. कुकुसाला स्थानिक नागरिकांकडूनही मोठी मागणी आहे. नागपूर, आंध्रप्रदेश व छत्तीसगढ येथे ऑइस फ्लॅक्टीमध्ये कुकुसची मागणी आहे. कोंढ्याचे दर मात्र, घसरले आहे. कोढ्यांची मागणी करणारे पॉवर प्लॅन्ट लॉकडाऊनमध्ये बंद होते. बहुतांश पॉवर प्लॅन्टची मुदत वाढवून न दिल्याने कोंढ्याच्या मागणीत घसरण झाली.त्याचाही फटका या उद्योगाला बसला आहे.

लॉकडाऊ नमुळे निर्यातीवरही परिणाम
जिल्ह्यातील तांदूळ देशात वितरीत होते. परंतु सततच्या लॉकडाऊ नमुळे निर्यातीवर मोठा परिणाम पडला आहे. सध्या १५ ते २० टक्क््यांवर हा व्यवसाय आला आहे. उष्ण तांदूळ ७ ते ८ विदेशात जातो. त्यावरही परिणाम पडला आहे.
बँकांनी २० टक्के कॅश के्रटीड वाढवून दिली आहे. परंतु ते उपयोगाचे नाही. त्याऐवजी व्याजाचा दर कमी केल्यास व्यवसायात वृध्दी होऊ शकते. तशी विनंती राईसमिल असोशिएनकडून करण्यात आली.

Web Title: Ricemill crisis in Corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.