शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पथदर्शी योजनांचा आयुक्तांकडून आढावा

By admin | Updated: July 10, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांना विविध योजनांच्यामार्फत मोठया प्रमाणात जलस्त्रोत उभारण्यासाठी पथदर्शी योजना कार्यरत आहेत.

अधिकाऱ्यांना सूचना : पूरक यंत्रणा उभारण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांना विविध योजनांच्यामार्फत मोठया प्रमाणात जलस्त्रोत उभारण्यासाठी पथदर्शी योजना कार्यरत आहेत. या योजना १०० टक्के यशस्वी होतील, यासाठी शासकीय यंत्रणेने पाठपुरावा करावा. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वषार्तून दोन पिके घेण्यासाठी प्रवृत्त करता येईल. त्यासाठी पूरक यंत्रणा जिल्हा परिषद प्रशासनाने उभारावी, असे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकूमार यांनी काल शनिवारी दिले. सिदेंवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना मत्सव्यवसायाच्या संदर्भात प्रशिक्षण दिल्यानंतर अनुपकूमार यांनी चंद्र्रपूर जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्याने रूजू झालेल्या विविध पदावरील तरूण अधिकाऱ्यांना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील जनतेच्या उत्थानासाठी आपल्या सेवेचा उपयोग करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य शासनाला २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्ज माफी करून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी जलयुक्त शिवार, माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिंचन विहिरी उभारणे, सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण करणे, तसेच आवश्यक वीज जोडण्या व मोटरपंप उपलब्ध करणे यासाठी योग्य नियोजन करण्याचे त्यांनी आवाहन केले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी वेगवेगळ्या पूरक यंत्रणा निर्माण करणे, हे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले पाहिजे. शासनाने यासाठी अनेक योजनांची निर्मिती केली आहे. जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्ससंवर्धन यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यावेळी उपस्थित कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी योजनांच्या माध्यमातून झालेल्या बदलाला लक्षात घेऊन शेतकरी आपला पिकपॅटर्न बदलतील, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सवयी, सुविधा लक्षात घेऊन शौचालयाच्या निर्मितीसाठी योग्य पर्याय पुढे करावे, स्वच्छ भारत कोषचा योग्य वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. जिल्हा परिषदेने केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात यंत्रणेने मागे राहू नये, असे आवाहन त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, माजी मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवन, सिंचन विहिरी, जलयुक्त शिवार, सिमेंट बंधारे या सर्व योजनांचा त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये साचलेल्या जलाशयाच्या पातळीला त्यांनी जाणून घेतले.