शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ मोहिमेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:58 IST

सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर

विजय वडेट्टीवार : सावली येथे शेकडो शेतकऱ्यांनी भरले अर्जलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी लावून धरली. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ‘चांदा ते बांदा’ संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यामुळे शासनाने दखल घेत दीड लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र या कर्जमाफीचा अद्यापही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ असे अर्ज आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांनी भरले. काँग्रेसने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सावली येथून करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळाचे उपगट नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रसेसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रेद्वारे राज्यभर फिरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. संघर्ष यात्रेनंतर शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे ११ सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगितले. मात्र दहा हजारांची उचल देण्याच्या निर्णयात अनेक जाचक अटी असल्याने आमचा विरोध सुरू आहे. सरकारने त्या अटी मागे घेतल्या. पण, प्रत्यक्षात आजपर्यंत राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी फक्त १ हजार ८२ शेतकऱ्यांना दहा हजारांची उचल मिळाली आहे, असे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी २४ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली व दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे शासन सांगत आहे. मात्र ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कर्जमाफीचे जिल्हानिहाय आकडे जाहीर केले. मात्र सरकारचे आकडे फसवे असून कर्जमाफीचा फायदा फारच कमी शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा कायम राहणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.यावेळी सावली तालुकाध्यक्ष राजेश सिध्दम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, नगराध्यक्ष रजनी भडके राकेश गड्डमवार, नंदा अल्लूरवार, वैशाली शेरकी, विजय कोरेवार, मनिषा जवादे, संगीता चौधरी, उर्मीला तरारे, उषा भोर, विलास यासलवार, छत्रपती गेडाम आदी उपस्थित होते.