शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडला पर्याय उड्डाणपुलासाठी अहवाल मागविला

By admin | Updated: December 23, 2016 00:47 IST

चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाहतूक प्रश्न यासाठी शहराला वळण मार्गाची गरज आहे.

नाना श्यामकुळे यांची धडपड : अधीक्षक अभियंता नागपूर यांना शासनाचे पत्र चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाहतूक प्रश्न यासाठी शहराला वळण मार्गाची गरज आहे. मात्र ज्या भागातून वळण मार्ग प्रस्तावित होता, त्याच ठिकाणी आता लोकवस्ती झाली आहे. याला पर्याय म्हणून इरई नदी ते बंगाली कॅम्प पर्यंत साडेसहा किलोमीटरचा उड्डाणपुल बांधकाला मंजुरी द्यावी, अशी मागणी ना. नितीन गडकरी व राज्य शासनाकडे यांच्याकडे आ. नाना श्यामकुळे यांनी केली होती. याबाबत शासन सकारात्मक असून उपविभागीय अभियंता तथा कर्यासन अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंता सां. बा. नागपूर यांना पत्र पाठवून सर्वकष विचार करून उचीत कार्यवाही व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे पत्र पाठविले आहे. चंद्रपूर शहराची वाढती लोकसंख्या तसेच औद्योगीकरण पाहता वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. १९८० मध्ये बायपाससाठी हॉटेल ट्रायस्टारच्या मागील भागातून तुकूम-शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाकडून जागा निश्चित करण्यात आली होती. या भागात आता जवळपास सातशे घरांची वस्ती आहे. इतकी मोठी वस्ती उठवून शहराच्या मध्यभागातून बायपास काढणे शक्य नसल्याने या बायपाससाठी स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. या भागातील वस्ती उठवून बायपास काढणे हे अन्यायकारक ठरणार असल्याने या बायपाससाठी मंजुरी देण्यात येऊ नये म्हणून उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने एक शपथपत्र दाखल करून बायपाससाठी नवीन जागेचा शोध सुरू असल्याचे म्हटले. मोरवा गावाच्या आतील भागातून लोहाऱ्यापर्यंत बायपास काढण्यात यावा, अशी सूचना होती. हे अंतर जवळपास ३५ किलोमीटरचे आहे. बायपाससाठी असलेल्या निकषामध्ये हे अंतर बसत नाही. त्यामुळे इरई नदी ते बंगाली कॅम्पपर्यंत उड्डाणपुलाची निर्मिती करणे हा एकमेव पर्याय आहे. यासंदर्भात अनेक दिवसांपासून आ. नाना श्यामकुळे यांनी पाठपुरावा सुरू ठेवून निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभागीय अभियंता तथा कर्यासन अधिकारी यांनी १९ नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंता सां. बा. नागपूर यांना पत्र पाठवून सर्वकष विचार करून उचीत कार्यवाही व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे पत्र पाठविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)