शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याला नापास केल्याचे माऊंटचे पुन्हा एक प्रकरण उघड

By admin | Updated: July 11, 2017 00:26 IST

येथील माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूलचे उत्तीर्ण विद्यार्थ्याला नापास केल्याचे पुन्हा एक प्रकरण सोमवारी पुढे आले आहे.

पोलिसात तक्रार : १३ मुलांना नापास केल्याचा राजेश जैन यांचा दावा, मुख्याध्यापिकेला जामीन लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूलचे उत्तीर्ण विद्यार्थ्याला नापास केल्याचे पुन्हा एक प्रकरण सोमवारी पुढे आले आहे. आपल्या मुलाला ५४.५४ टक्के गुण असतानाही त्याला नववीमध्ये नापास केल्यामुळे त्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप राजेश जैन या पालकाने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी शाळेतील १३ विद्यार्थ्यांना अशाचप्रकारे नापास केल्याचा दावाही जैन यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त गुणपत्रिकेच्या आधारे केला आहे.याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून माऊंट कारमेल कान्व्हेंट हायस्कूल प्रशासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील किती विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले व कोणत्या कारणांसाठी देण्यात आले, याबाबींची चौकशी करण्याची मागणीही यावेळी जैन यांनी केली. ते म्हणाले, लहान मुलगा धर्मांशु हा २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सदर शाळेत नवव्या वर्गात शिकत असताना अंतिम परिक्षेचा निकाल घेण्यासाठी गेलो असता मुख्याध्यापिकेने गुणपत्रिका न दाखविता मुलगा नापास झाल्याचे सांगितले. यानंतर त्यांना वारंवार मुलाची गुणपत्रिका व त्याने सोडविलेले पेपर दाखविण्याची विनंती केली, परंतु आजपर्यंत ती दाखविली नाही. त्यांना मुलाच्या भविष्याबाबत विचार करा, असे म्हटले, तर मुख्याध्यापिका नित्या यांनी शाळेत आॅडिटोरियम हाल बनविण्याकरिता २५ हजार रुपये फंड मागितला. फंड न दिल्यास टीसी देतो, असे म्हणाल्या, असा गंभीर आरोपही जैन यांनी यावेळी केला. २५ हजार रुपये देण्यास असमर्थता दर्शविली असता धर्मांशुची टीसी दिली. त्यावर ‘नीड्स इन्प्रुवमेंट इन स्टॅन्डर्ड नाइन’ असे नमुद असल्याचे ते म्हणाले. बिल्डींगच्या बांधकामाकरिता २५ हजार दिले नाही म्हणूून मुलाला नापास केल्याचा गंभीर आरोपही जैन यांनी केला. राजेश ठाकूर या पालकाने दाखल केलेल्या प्रकरणात मुख्याध्यापिका नित्या जोसेफ व शिक्षिकेला सना खत्री यांना जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन मिळाल्याची माहिती सूत्राने दिली. शिक्षणाधिकाऱ्यांकडील गुणपत्रिकेत उत्तीर्णमाहितीच्या अधिकारातही मुलाचे पेपर दिले नाही. नवव्या वर्गातून टीसी दिलेल्या युवराजच्या वडील राजेश ठाकूर यांच्याकडून माऊंट कॉन्व्हेंटच्या १३ मुलांना नापास केले. त्याची गुणपत्रिका शिक्षणाधिकाऱ्याकडून प्राप्त केली. धर्मांशु याला इंग्रजीत ५३.३, हिंदी ६८.७, सायन्स ५३.३, सोशल सायन्स ५२.७ टक्के गुण असल्याचे दिसून आले. तेव्हा आपला मुलगा नापास झाला नसल्याचे उघड झाल्याचेही राजेश जैन म्हणाले.१७ नंबरचा फार्म भरून दहावीची तयारीशाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन चंद्रपूर येथील इतर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले असता कुठेही प्रवेश मिळाला नाही. यामुळे मुलाची मानसिक स्थिती खालावली असल्याचा गंभीरही राजेश जैन यांनी केला.अखेर वर्ष वाया जाईल, या भीतीने १७ नंबरचा फार्म भरून धर्मांशु दहाव्या वर्गाची तयारी करीत असल्याची माहिती जैन यांनी दिली.