कृषी कल्याण योजनांसाठी शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:34+5:30

‘योजना शेतकऱ्यांच्या दारी’ या अभियानाला २६ नोव्हेंबर २०१९ पासून सुरूवात झाली. चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले होते. कृषी विकासाच्या संपूर्ण योजना शेताच्या बांधापर्यंत पोहोचवा, असे निर्देश अध्यक्ष भोंगळे यांनी प्रशासनाला दिले होते. शासनाच्या विविध योजनांचे स्वरूप शेतकऱ्यांना सहजरीत्या समजावे, याकरिता पथनाट्याच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येत आहे.

Registration of farmers for agricultural welfare schemes | कृषी कल्याण योजनांसाठी शेतकऱ्यांची नोंदणी

कृषी कल्याण योजनांसाठी शेतकऱ्यांची नोंदणी

ठळक मुद्देजागृती चित्ररथाला प्रतिसाद : जिल्हाभरात माहिती पत्रके पोहोचविण्याची मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य व केंद्र्र शासनाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत चित्ररथांद्वारे १५ तालुक्यातील गावागावांमध्ये जागृती केल्या जात आहे. माहितीपट व फलक तसेच कृषी कल्याण योजनांची पत्रके वितरणाची मोहीम सुरू झाली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी नोंदणी करीत आहेत.
अभियानाला जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद मिळत असून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकºयांनी संपर्क साधून ऑनलाईन अर्ज सादर केले जात आहे.
‘योजना शेतकऱ्यांच्या दारी’ या अभियानाला २६ नोव्हेंबर २०१९ पासून सुरूवात झाली. चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले होते. कृषी विकासाच्या संपूर्ण योजना शेताच्या बांधापर्यंत पोहोचवा, असे निर्देश अध्यक्ष भोंगळे यांनी प्रशासनाला दिले होते. शासनाच्या विविध योजनांचे स्वरूप शेतकऱ्यांना सहजरीत्या समजावे, याकरिता पथनाट्याच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येत आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हा माहिती कार्यालयात बैठक पार पडली. अशा विविध योजनांमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा सिंचन क्रांती आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजना अशा विविध योजनांचा यात समावेश आहे. योजनांची माहिती व्हिडिओ व पत्रकांद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, याकरिता १५ चित्ररथ तालुकानिहाय प्रत्येक गावागावात पोहोचून आठवडी बाजारातही प्रसिद्धी करण्यात येत आहे. प्रशासनाच्या अभियानाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले आहे. शेतकरी हिताच्या विविध योजनांमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, पीक विमा योजनेपासून विविध योजनांचा समावेश आहे. लाभ घेण्यासाठी ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक, तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन माहिती विभागाने केले.

कृषी सहायकांनी द्यावी शेतकऱ्यांना माहिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा सिंचन क्रांती योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी निकष आहेत. याची माहिती तालुकास्तरावरील पंचायत समिती कार्यालयाचे कृषी अधिकारी व जि. प. कृषी विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. शिवाय ग्रामीण भागात कर्तव्य बजावणाऱ्या कृषी सेवकांनीही ही माहिती शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश आहेत. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट आपले सरकार डॉट कॉम या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येते, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

Web Title: Registration of farmers for agricultural welfare schemes

टॅग्स :Farmerशेतकरी