शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातील बंड शमले, चिमुरात बंडखोरी

By admin | Updated: October 1, 2014 23:19 IST

नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहाही मतदार संघात मिळून १०७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार चिमूर

रिंगणात १०७ उमेदवार : चिमूर विधानसभेची जम्बो यादीचंद्रपूर : नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहाही मतदार संघात मिळून १०७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार चिमूर विधानसभा मतदारसंघात असून सर्वात कमी उमेदवार चंद्रपूर विधानसभा मतदार संघात आहेत.१५३ उमेदवारांपैकी बुधवारी ४५ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. यामुळे रिंगणातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. वरोरा मतदार संघामध्ये संजय देवतळे यांनी भाजपाची तिकीट स्विकारल्याने राजकारणात प्रचंड चर्चा सुरू झाल्या होत्या. स्थानिक भाजपा नेत्यांनी पहिल्या दिवशी बंडखोरीचा पवित्रा घेत संजय देवतळे यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र दोन दिवसातच बंड थंडावले आहेत. भाजपातील सहा पदाधिकाऱ्यांनी नामांकन दाखल केले होते. त्यातील एकाचे नामांकन कायम ठेवून भाजपा कार्यकर्ते त्याच्यां पाठीशी राहतील असे ठरले होते. मात्र भाजपा नेत्यांना वरोरातील बंड थंड करण्यात यश आले आहे.चिमूरमध्येही अशीच स्थिती होती. तिथे पक्षातीलच चार जण उभे होते. मात्र तीघांनी आज बुधवारी नामांकन परत घेतले. असे असले तरी विलास दोनोडे यांनी आपले नामांकन कायम ठेवल्याने चिमूरमध्ये भाजपात बंडखोरी स्पष्ट दिसत आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आरपीआयचे प्रमोद सोरते, रिपब्लिकन सेनेचे तथागत पेटकर यांच्यासह एकूण आठ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. आता या विधानसभा क्षेत्रात एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून तीन जणांना अर्ज मागे घेतला. आता येथे एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत.ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करणारे अरविंद जयस्वाल यांच्यासह पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. या क्षेत्रात आता १५ उमेदवार मैदानात आहेत. चिमूर विधानसभा मतदार संघातून १३ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. यात भाजपाचे धनराज मुंगले, वसंत वारजूरकर, काँग्रेसचे सतीश वारजूकर यांचा समावेश आहे. आता या क्षेत्रात एकूण २९ उमेदवार रिंगणात आहेत. राजुरा मतदार संघातून तिघांनी आपले नामांकन परत घेतले. यात राष्ट्रवादीचे पंकज पवार, संदीप करपे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. या संघात १६ उमेदवार आपले नशिब अजमावणार आहेत. वरोरा मतदार संघातून काँग्रेसचे विजय देवतळे व भाजपाचे ओम मांडवकर या प्रमुख उमेदवारांसह एकूण १३ उमेदवारांनी नामांकन परत घेतले. या संघात आता १८ उमेदवार रिंगणात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)