शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या जाळ्यात ओढून मागितली खंडणी

By admin | Updated: July 7, 2017 01:07 IST

घराजवळच राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एक ते दीड वर्ष त्यांची

पोलिसांनी सापळा रचून केली अटक : युवतीच्या तक्रारीची पोलीस अधीक्षकांकडून तत्काळ दखललोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : घराजवळच राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एक ते दीड वर्ष त्यांची ही मैत्री बहरली. बाग-बगिच्यात फिरणे, फोटो काढणे सुरू राहिले. त्यानंतर मात्र युवकाने वेगळाच पवित्रा घेतला. काढलेले फोटो हवे असतील व संबंध तोडून दुसऱ्याशी लग्न करायचे असेल तर खंडणी दे, असे म्हणत युवतीला त्रास देणे सुरू केले. अखेर याबाबत युवतीने तक्रार करताच रामनगर पोलिसांनी सापळा रचून या युवकाला अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. विकास कवडूजी ढोके (२४) रा. म्हाडा कॉलनी चंद्रपूर असे आरोपी युवकाचे नाव आहे. म्हाडा कॉलनीतच आरोपी विकासच्या घराजवळ पीडित युवतीचे घर आहे. त्यामुळे ओळखी होणे स्वाभाविक आहे. तशी दोघांचीही ओळखी झाली. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्रीही झाली. एक ते दीड वर्ष दोघांमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. यादरम्यान, दोघेही बाग-बगिचात फिरायचे. या मैत्रीचा फायदा घेत विकासने तिच्यासोबत रामाळा तलावात फोटोही काढले. त्यानंतर मात्र विकासने आपला पवित्रा बदलला. सदर युवतीसोबत काढलेले फोटो दाखवून विकास तिला ब्लॅकमेल करू लागला. फोटो हवे असतील व दुसऱ्याशी लग्न करायचे असेल तर पैसे दे, असा तगादा लावत तो तिला त्रास देऊ लागला. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित युवतीने पोलिसांकडे तक्रार केली. जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना भेटून आपबिती सांगितली. पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी याची गांभीर्याने दखल घेत रामनगर पोलिसांना सूचना दिल्या. दरम्यान, आरोपी विकासने पीडित युवती व तिच्या भावाला बुधवारी विद्या निकेतन शाळेजवळ पैसे घेऊन बोलाविले. यादरम्यान, रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोतमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सापळा रचून त्याला तिथेच पकडले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी रात्री त्याच्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक धनंजय सायरे, राकेश निमगडे, परवेज खान, रुपेश पराते व रामनगर पोलिसांनी केली. पुढील तपास सायरे करीत आहेत.