शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील बँकवॉटरचा शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात दगडी कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने खुल्या खाणी निर्माण केल्या. परंतु, पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले, असा आरोप परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.

ठळक मुद्देवेकोलिचे उपाययोजनेकडे दुर्लक्ष : ढिगाऱ्यांमुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यावर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला. पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसतो. मात्र वेकोलिने यंदाही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात दगडी कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने खुल्या खाणी निर्माण केल्या. परंतु, पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले, असा आरोप परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.मातीचे ढिगारे नदी नाल्याच्या काठावर टाकल्याने नैसर्गिक नाल्याचे पात्र बदलले. पावसाळ्यातील पाणी नाल्या न जाता शेतात शिरते. यातून दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. वेकोलिने ३० वर्षांपूर्वी गोवरी-सास्ती परिसरात कोळसा खाण सुरू केली. तेव्हापासून हा परिसर डेंजरझोन म्हणून गणल्या जात आहे.कोळशाचे उत्पादन घेत असताना जिल्हा प्रशासनाकडून वेकोलिला अनेकदा नोटीसा दिल्या. परंतु, शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मातीचे ढिगारे कर्दनकाळ ठरले आहेत पावसाळ्यात गोवरी, सास्ती, पोवनी परिसरातील बहुसंख्य गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येते. वेकोलिचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. जल, वायु प्रदूषण वाढले. परंतु वेकोलिने गावकऱ्यांच्या समस्यांवर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात बॅकवॉटरमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होऊ शकते.सात गावांतील शेतकऱ्यांमध्ये चिंतावेकोलिने कोळसा खनन करून टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे दरवर्षी गोवरी, सास्ती, पोवनी, मानोली, बाबापूर, कढोली, कोलगाव परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. पिकांची उत्पादकता घटते. पुराच्या पाण्यामुळे शेतीकडे जाणारे रस्ते बंद होतात. अनेक गावांचा संपर्क तुटतो. यंदाही हीच वेळ येऊ शकते.

टॅग्स :Rainपाऊस