शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

पडोली ते राजुरा चौपदरीकरणात चुनखडीचा वापर, मजबुतीवर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारपदरी रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर होत नसल्याचे बघायला मिळत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास चंद्रपूर ते मूल मार्गावर रामनगर पोलीस ठाण्यापासून बांधकाम सुरू असलेल्या मार्गावर काळ्या गिट्टीचा वापर होत आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : निकृष्ट दर्जाचा रस्ता अल्पावधितच खराब होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पडोली ते राजुरा या बायपास मार्गाच्या चौपदरीकरणाचे बांधकाम गतीने सुरू आहे. ही विकासाच्या दृष्टीने चांगली बाब असली तरी या मार्गाच्या बांधकामात कंत्राटदार कंपनी मात्र चुनखडीचा सर्रासपणे वापर करीत आहे. परिणामी २५० कोटी रुपये खर्चून बांधकाम सुरू असलेला हा रस्ता फार काळ टिकणार नसल्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारपदरी रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर होत नसल्याचे बघायला मिळत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास चंद्रपूर ते मूल मार्गावर रामनगर पोलीस ठाण्यापासून बांधकाम सुरू असलेल्या मार्गावर काळ्या गिट्टीचा वापर होत आहे. या गिट्टीमुळे रस्ता मजबूत होईल, शिवाय दीर्घकाळ टिकणार. रस्त्यावर चुनखडीचा वापर केल्यास ही गिट्टी फार काळ टिकणार नाही. रस्ता तयार झाल्यानंतर त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू झाल्यानंतर ही चुनखडी फुटून अल्पावधितच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार होईल. यामुळे पुन्हा या मार्गाने वाहनधारकांना खस्ता खाव्या लागेल, असेही बोलले जात आहे.पडोली-दाताळा-हडस्ती ते राजुरा अशा या बायपास रस्त्यासाठी राज्य शासनाने २५० कोटींचे टेंडर काढले होते. हे टेंडर बाहेर राज्यातील एम.बी. पाटील कंस्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून राजुरा-पौनी-कवठाळा-नारंडा-वनोजा ते कोरपना या मार्गाचेही काम सुरू आहे.या मार्गावरही सुरुवातीला या कंपनीने मेजर मिनरलचा सर्रास वापर सुरू केला होता. याकडे ‘लोकमत’ लक्ष वेधल्यानंतर कंस्ट्रक्शन कंपनीचे धाबे दणादले होते. लगेच मेजर मिनरचा वापर बंद केला होता. मात्र पडोली ते राजुरा या मार्गाच्या बांधकामात काही ठिकाणी काळी गिट्टी तर काही ठिकाणी चुनखळी गिट्टीचा वापर सुरू केल्यामुळे कंपनीच्या उद्दीष्टाबाबत संशय बळावला आहे. असे करण्यास कंपनी धजावत असल्यामुळे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाठबळ असल्याचेही बोलले जात आहे.अन्य कंत्राटदारांमध्ये कुजबुजआजवर जिल्ह्यात झालेल्या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर अन्य कंस्ट्रक्शन कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने करू दिलेला नाही. चुनखडीमुळे हा रस्ता फारकाळ टिकत नाही, असे असताना पडोली - राजुरा मार्गावर मात्र चुनखडीचा वापर होत असतानाही बांधकाम विभाग शांत कसा, असा सवाल काही कंत्राटदारांकडून उपस्थित केला जात आहे.

रस्ता बांधकामाची चौकशी व्हावीपडोली ते राजुरा रस्ता बांधकामासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. या निधीचा विनियोग व्हावा. मागील अनेक वर्षांची या रस्त्याची खस्ताहालत कायमची दूर होईल. चंद्रपूर ते राजुरासाठी कमी लांबीचा हा रस्ता जडवाहनांंसाठी महत्त्वाचा असेल. या रस्त्यावर भविष्यात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असणार आहे. या महत्त्वपूर्ण रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर तो अल्पावधित खराब होण्याची शक्यता जाणकार मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा