शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिवती येथे हिवतापावर जनजागृती

By admin | Updated: May 8, 2015 01:12 IST

जीवती प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी एका कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली.

जीवती : जीवती प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी एका कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.एम. मुरंबीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डी.टी. नन्नावरे, वैद्यकीय अधिकारी जिवती के.जी. कोरडे, डॉ. हेमंत फुलझले, डॉ. भूषण मोरे, डॉ. शालिनी तरोणे उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी डॉ. श्रीराम गोगुलवार यांनी आदिवासी दुर्गम क्षेत्रातील तालुका जिवती येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता सदर क्षेत्रात हिवतापाचा प्रादूर्भाव अधिक आढळून येतो. हिवताप या आजाराला आळा घालण्यासाठी जनतेने विविध हिवताप प्रतिबंधक उपाययोजनांचा वापर करावा तसेच तालुक्यात आरडीकेचा वापर, एसीटीचा समूळ उपचार आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकामार्फत जास्त प्रमाणात होण्यासाठी मार्गदर्शन केले. सोबतच जिल्हास्तरावरुन हिवताप विरोधी औषधसाठा वेळोवेळी पुरविण्यासंदर्भात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, डासांच्या प्रतिबंधासाठी खिडक्यांना जाळ्या लावाव्या, गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाईपला जाळ्या बांधाव्या, मच्छरदाणीचा वापर करावा, नाल्या वाहत्या करणे, किटकनाशक फवारणी करणे, आदी उपाययोजना यावेळी सांगितल्या. संघर्ष बहुउद्देशिय सामाजिक संस्था चंद्रपूरतर्फे कलापथक नाटय कार्यक्रमाद्वारे हिवताप आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. उपकेंद्र नगराळा येथेही जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)