शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

प्रियदर्शिनी सभागृहाने कात टाकली

By admin | Updated: July 13, 2017 00:35 IST

चंद्रपूर महानगरातील सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्र असणारे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाने कात टाकली असून ....

आज लोकार्पण : मंत्र्यांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरातील सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्र असणारे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाने कात टाकली असून आपल्या नव्या स्वरुपात जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहे. १३ जुलै रोजी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया, आ. ना.गो.गाणार, आमदार नाना शामकुळे, आ. विजय वडेट्टीवार, आ. सुरेश धानोरकर, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आ.अ‍ॅड.संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, सार्वजनिक बांधकाम नागपूर विभागाचे अधिक्षक अभियंता रविंद्र आकुलवार, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, कार्यकारी अभियंता उदय भोयर उपस्थित राहणार आहेत. कलाप्रेमींनी उपस्थित रहावे.सभागृहाचे रुप पालटले नाट्य चळवळीतील अनेक मान्यवरांच्या मागणीवरुन १९९९ ला ही इमारत पूर्णत्वास आली. गेल्या २० वषार्पासून ही इमारत नाटय व साहित्य प्रेमींसाठी महत्वाचे केंद्र आहे. नाटय व कला क्षेत्रात अनेक तांत्रिक परिवर्तन झाले. या नव्या प्रवाहात आधुनिक ध्वनी, उच्च दर्जार्ची वातानुकूलित बैठक व्यवस्था व प्रकाश व्यवस्थेने परिपूर्ण असे प्रियदर्शनीचे स्वरुप असावे, असा विचार पुढे आला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सभागृहाचे अत्याधुनीकरण करण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार हे सभागृह तयार झाले आहे. संपूर्ण सभागृह, रंगमंच, नवीन खुर्च्या, विद्युतीकरण, सभागृहाचे सिलिंग, वॉल पॅनेलींग, जनरेटर व हायमास्ट लायटींग अशा सर्व सुविधा येथे आहे.