शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला, किराणा आणि फळांच्या किंमतीही भडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फ‌ळांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सफरचंद २ हजार २०० रुपयांच्या पेटीवरून २ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले आहे.

ठळक मुद्देबजेट कोलमडले। किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचे संकट त्यातच परतीच्या पावसाचा धुमाकुळ यामुळे बाजारपेठांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. परिणामी सामान्य नागरिकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. अन्यधान्य, तेलांच्या किंमती वाढल्या असतानाच आता भाजीपाल्यानेही यात भर घातली आहे.किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फ‌ळांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सफरचंद २ हजार २०० रुपयांच्या पेटीवरून २ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. तर मोसंबी ८०० रुपयांवरून १ हजार ३०० रुपयांवर तर दाळींब २० किलोचा कॅरेट १ हजार ६०० रुपयांवर २ हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. यामुळे चिल्लर व्यावसायिकांनीही दरवाढ केली आहे. परिणामी ग्राहकांना मोठा आर्थिक फटसा सहन करावा लागत आहे.तूर डाळ २० रुपयांनी महागलीमागील दहा दिवसांपूर्वीच्या तुलनेत तूळ दाळीमध्ये २० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. पूर्वी १०० रुपये किलो असणारी दाळ आता १२० रुपये किलोने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. त्यासोबतच खाद्य तेलांच्या किंमतीमध्ये प्रति किलो पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना अडचण जात आहे.फळांच्या किंमती वाढल्यानवरात्रोत्सवामुळे फळांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसाच्या तुलनेमध्ये किलोमध्ये प्रत्येक फळांच्या किंमतीत ५० ते ६० रुपयांची वाढ झाली.परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बाहेरून येणाऱ्या भाजीपाल्याची आवकही कमी झाल्याने मागील काही दिवसात किंमती झपाट्याने वाढल्या आहे. आठवड्याच्या भाजीपाल्यासाठी किमान पाचशे रुपये मोजावे लागत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याfruitsफळे