शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व पाहणी

By admin | Updated: May 17, 2015 01:34 IST

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दाताळा पूल, रहेमतनगर व रामाळा तलावाची मान्सुनपूर्व पाहणी केली.

चंद्रपूर : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दाताळा पूल, रहेमतनगर व रामाळा तलावाची मान्सुनपूर्व पाहणी केली. रामाळा तलावातील अतिक्रमण हटविणे, संरक्षण भिंत व उद्यानातील दुरूस्ती याबाबत या पाहणीत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.यावेळी मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. शेख, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, नियोजन अधिकारी एम. एम. सोनकुसरे, कार्यकारी अभियंता लेहगावकर, उपअभियंता वानखेडे, नगरसेवक संजय वैद्य, सिंचन विभागाचे अभियंता सोनवणे व अधिकारी उपस्थित होते.दाताळा येथील पुलाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. पावसाळ्यापूर्वी घेण्याच्या खबरदारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यानंतर रहेमतनगर येथे भेट देऊन पूरप्रवण भागाची पाहणी केली. गेल्या वर्षी रहेमतनगर भागात पुराचे पाणी आले होते. या पाहणीत जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. नाली सफाईचे काम तत्काळ करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.रामाळा तलावाची पाहणी करताना तलावातील गाळ काढणे व संरक्षण भिंतीची दुरूस्ती तत्काळ करावी, असे निर्देश दिले. त्याचप्रमाणे रामाळा तलाव येथील उद्यानाला त्यांनी भेट दिली. उद्यानातील भिंतीचे अंदाजपत्रक सिंचन विभागाने तत्काळ तयार करून दुरूस्ती करावी. या उद्यानात सायन्स पार्क उभारणे व बालोद्यानाची दुरूस्ती याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. उद्यानात जाण्यासाठी गंजवार्डकडून रामाळा तलावावर फुटवे (पादचारी पूल) सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ तयार करावा व तलावाच्या पाळीवर वाहनासाठी पार्किंग व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)