काँग्रेसच्या सत्ताकाळातच राज्यातील नगरपालिका सक्षम

By Admin | Updated: October 10, 2016 00:43 IST2016-10-10T00:43:34+5:302016-10-10T00:43:34+5:30

काँग्रेसच्या सत्ता काळात राज्यातील नगरपालिका सक्षम झाल्या असून कॉग्रेसने राज्यातील नगरपालिकेच्या विकासासाठी ...

In the power of the Congress, the municipality of the state is competent | काँग्रेसच्या सत्ताकाळातच राज्यातील नगरपालिका सक्षम

काँग्रेसच्या सत्ताकाळातच राज्यातील नगरपालिका सक्षम

अशोक चव्हाण : विविध विकास कामांचे उद्घाटन
राजुरा : काँग्रेसच्या सत्ता काळात राज्यातील नगरपालिका सक्षम झाल्या असून कॉग्रेसने राज्यातील नगरपालिकेच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यानूसारच राजुरा नगरपालिकेचा झालेला चौफेर विकास काँग्रेसच्या कल्पकतेची पावती आहे, असे प्रतिपादन नगर परिषद सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी आंबेडकर वॉर्डातील सांस्कृतिक सभागृह, इंदिरानगर येथील खुले सभागृह, मौलाना आझाद वॉर्डातील अल्पसंख्याक सभागृह, जलतरण तलाव, रमानगरातील जलकुंभ, सोमनाथपुरातील फायरब्रिगेड क्वॉर्टसचे एकत्रीत लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती मानिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक, ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी आमदार सुभाष धोटे, बाबुराव तिडके, अनंतराव घारड, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार आनंदराव गेडाम, नामदेव उसेंडी, प्रकाश मारकवार, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, राजुरा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील देशपांडे, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा लांडे, गटनेता स्वामी येरोलवार, नगरसेवक शामसुंदर बोलम, येसेकर, सय्यद अली उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: In the power of the Congress, the municipality of the state is competent