शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात मतदान प्रक्रिया शांततेत

By admin | Updated: October 15, 2014 23:31 IST

विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ब्रह्मपुरीत पावसाने व्यत्यय आणला, मात्र दुपारी मतदानाने जोर पकडला.

चंद्रपूर : विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ब्रह्मपुरीत पावसाने व्यत्यय आणला, मात्र दुपारी मतदानाने जोर पकडला.१५ आॅक्टोबरच्या रात्री अडीच वाजता सिंदेवाहीचे माजी पंचायत समिती सभापती अरविंद जयस्वाल एका काँग्रेस पदाधिकाऱ्यासह दुचाकीने येताना पोलिसांना आढळले. त्यावरून झालेल्या चौकशीदरम्यान प्रकरण विकोपाला गेले. त्यांना पोलिसांनी अटक करुन ठाण्यात नेले. मात्र तिथे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना चंद्रपुरातील एका खाजगी रूग्णालयात आणून उपचार करण्यात आल्याने वातावरण दिवसभर गरम होते. अशातच, ब्रह्मपुरीतील एका केंद्रावर राकाँचे कार्यकर्ते रक्कम वाटत असल्याची तक्रार आ. विजय वडेट्टीवार यांनी पोलिसात केल्याने या घटनेवरूनही काही काळ शहरात वातावरण गरम झाले होते. हे दोन अपवाद वगळता आणि दुपारी पावसाचा व्यत्यय वगळता मतदान सुरळीत पार पडले. चिमूरमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी उमेदवारांच्या एकमेकांविरुद्धच्या तक्रारींमुळे मतदानाच्या दिवशी वातावरण गरम राहील, असा बहुतेकांचा अंदाज होता. पोलिसांनीही या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त लावला होता. मात्र कसलाही प्रकार न घडता ३०५ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सायंकाळनंतर काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. वरोरा विधानसभा मतदार संघातील ३११ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. केवळ इव्हिएम मशिनमधील तांत्रिक बिघाड वगळता कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. वरोरा तालुक्यात तीन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडले होते. त्यामुळे अर्धा तास मतदान ठप्प पडले. नंतर मात्र पूर्ववत सुरू झाले. केम येथील मतदान केंद्रावर अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. त्यामुळे या केंद्रावरील मतदान काही काळ बंद पडले होते. त्यानंतर केंद्राध्यक्षाला मशीन बदलवून मागण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)