शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर मतदार संघात शांततेत पार पडले मतदान

By admin | Updated: October 15, 2014 23:31 IST

चंद्रपूर विधानसभा मतदार संघात बुधवारी शांततेत मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता. मात्र काही मतदान केंद्र वगळता अन्य ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या नाहीत.

७१-चंद्रपूर विधानसभा मतदार संघात बुधवारी शांततेत मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता. मात्र काही मतदान केंद्र वगळता अन्य ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या नाहीत. दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली. काही परिसरात वाहनांद्वारे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले जात होते. दरम्यान, चंद्रपुरातील संजयनगरमधील राजीव गांधी महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ८४ वरील ईव्हीएम मशीनमधून आवाज येत नसल्याने येथील मशीन दुरूस्त करण्यात आली. तोपर्यंत किमान अर्धा तास मतदानाची प्रक्रिया रखडून पडली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.३२ टक्के मतदान झाले होते.बंद काळात मद्य आले कुठून?निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागील १३ ते १६ आॅक्टोबरपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना याच काळात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूची विक्री झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी मद्यपींचा उपद्रव दिसून आला. ही दारू आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.मतदान केंद्र परिसरात असाही प्रतापचंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयामागील परिसरातील राजे धर्मराव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र परिसरात एका मद्यपीने दुपारी मतदारांचे लक्ष वेधले. क्षमतेपेक्षा अधिक मद्यप्राशन केल्याने तो मतदान केंद्रापर्यंतही पोहचू शकला नाही. काही वेळाने त्याने रस्त्याच्या काठावरच स्वत:ला निद्रावस्थेत झोकून दिले. एकाच केंद्रावर १ हजार ६६८ मतदारचंद्रपुरातील वडगाव केंद्र क्रमांक ३१ जवळ तीन मतदान केंद्र असले तरी ३१ व्या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर १ हजार ६६८ मतदार जोडण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत यांपैकी केवळ २६० मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानासाठी असलेल्या ११ तासांमध्ये या सर्व मतदारांना मतदान करावयाचे होते. मतदानासाठी असलेली वेळ आणि मतदारांची संख्या लक्षात घेता या मतदान केंद्रावरील मतदारांना अन्य मतदान केंद्रावर जोडणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने तसे केले नाही. परिणामी या मतदान केंद्रावर मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजता या मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग लागली होती. नेमून दिलेल्या वेळेत आपल्याला मतदान करता येईल की नाही, याबाबत सांशकता होती.