युवकांना पोलीस ठाण्यात मारहाण

By Admin | Updated: June 10, 2014 23:59 IST2014-06-10T23:59:29+5:302014-06-10T23:59:29+5:30

एका आरोपीची चौकशी करण्यासाठी कर्नल चौकातील पानठेल्यावर उभ्या असलेल्या अशील ब्राह्मणे (२८) या युवकाला येथील पोलीस ठाण्यामध्ये आणले. आरोपी कुठे गेला, हे तुला माहीत आहे असे म्हणत राजुरा पोलिसांनी

The police beat the youth in the police station | युवकांना पोलीस ठाण्यात मारहाण

युवकांना पोलीस ठाण्यात मारहाण

राजुरा : एका आरोपीची चौकशी करण्यासाठी कर्नल चौकातील पानठेल्यावर उभ्या असलेल्या अशील ब्राह्मणे (२८) या युवकाला येथील पोलीस ठाण्यामध्ये आणले. आरोपी कुठे गेला, हे तुला माहीत आहे असे म्हणत राजुरा पोलिसांनी त्या युवकाला बेदम मारहाण केली. त्याच्या बोटात असलेले चांदीची अंंगठी कापून बोटातून काढण्यात आली.
गळ्यामध्ये असलेली रुद्राक्षाची माळ तोडून टाकली. त्याच्या पायावर हातावर बाजीराव पट्टयाने मारले. या मारहाणी तो गंभीर जखमी झाला असून कोणता गुन्हा नसताना एका निरपराध युवकाला बेदम मारहाण झाली. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची भेट घेऊन या मारहाणीच्या चौकशीची मागणी केली.
या शिष्टमंडळात अ‍ॅड. राम धोटे, बादल बेले, रुपेश चिडे, अमित जयपूरकर, सागर भटपल्लीवार, उमेश मारशेट्टीवार यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The police beat the youth in the police station