शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

गणेश उत्सवाकरिता पोलीस प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:39 IST

मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करून सामाजिक ऐक्य अबाधित राखून गणेश उत्सव साजरा करण्यात यावा, ..

ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई होणार : गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करून सामाजिक ऐक्य अबाधित राखून गणेश उत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्हा शांतता समिती तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंडळ पदाधिकारी यांना गणेश उत्सव १० दिवसाच्या कालावधीत काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले़न्यायलयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदुषण करणाऱ्या डी़जे़ वापरावर बंदी घालण्यात आली आहे. येणारा गणेशउत्सव शांतपणे सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा व्हावा, याकरिता पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष आहे़ गणेश उत्सवदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे़ ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विशेष पथकाद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे़ गतवर्षी गणेश विर्सजन मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या २२ गणेश मंडळावर कारवाई करण्यात आली होती़ डीजे वापरावर पूर्णत: बंदी आल्यामुळे यावेळी मिरवणुकी दरम्यान कुणीही डिजेचा वापर करणार नाही, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे़ ध्वनी प्रदूषण करून न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे़ याबाबत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी माहिती दिली आहे़सर्वांनी ध्वनीप्रदूषण रोखण्याची जबाबदारी स्वीकारावीध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पोलीस विभागातर्फे जनजागृतीकरिता विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहे़ ध्वनी प्रदूषण कमी करणे ही प्रशासनाचीच नाही तर समाजाची सुध्दा जबाबदारी आहे़ ध्वनी प्रदूषण कायद्याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांचे प्राथमिक कर्तव्य आहे़ गणेश उत्सवाच्या सुरूवातीपासूनच डीजे न वापरण्यास सुरूवात करून पुढे कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रम आणि सण उत्सवादरम्यान कोणीही डिजे वाजविणार नाही, हा संकल्प करून प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले.