शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शूरवीरांची प्रेरणा घेऊन समाजाने पुढे जावे

By admin | Updated: November 1, 2015 01:13 IST

नाभिक समाजात आनंद रूपाली, जिवाजी महाले, भैय्याजी कोतवाल, सेना महाराज, नगाजी महाराज या सारख्या थोर व शुरविरांना जन्माला आलेत.

हरीश ससनकर : भद्रावतीत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवभद्रावती : नाभिक समाजात आनंद रूपाली, जिवाजी महाले, भैय्याजी कोतवाल, सेना महाराज, नगाजी महाराज या सारख्या थोर व शुरविरांना जन्माला आलेत. अशा थोर व शूरविरांची प्रेरणा घेवून समाजाने पुढे जावे, असे आवाहन नाभिक समाज इतिहासतज्ज्ञ तथा जिवा महाले चित्रपटाचे पटकथा लेखक हरीश ससनकर यांनी शनिवारी येथे केले. येथे आयोजित नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात आनंद रूपाली यांच्या कार्याला उजाळा देताना ते म्हणाले, आनंद रूपाली हा सामान्य न्हाव्याच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा तो गौतम बुद्धाच्या पाच शिष्यांपैकी एक होता. ज्या काळात बुद्धाची परंपरा खंडीत झाली, त्यावेळी या रूपालीने आपले कौशल्य सिद्ध करून मोठमोठ्या पंडितांना पराभूत करून गौतम बुद्धाच्या मोठमोठ्या परिषदा भरवून देशातच नव्हे तर जगात बौद्ध धर्माचा प्रसार केला. याच समाजातील जीवा महालेने शिवाजी महाराजांचा अंगरक्षक बनून शूरता गाजविली होती, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व्ही.व्ही. किन्हीकर होते. कार्यक्रमाला सत्कारमूर्ती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी उपाध्यक्ष, नगरसेविका रेखा कुटेमाटे, दिनेश ऐकोणकर, विनोद वानखेडे, बापूराव जूनारकर, माया चिंचोलकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी आपल्या भाषणातून भद्रावती शहरातील विकासाला उजाळा दिला. ते म्हणाले, नगाजी महाराज मंदिराला नगरपरिषद निधीतून रक्कम दिली जाईल. समाज भवनाचे बांधकाम पूर्ण होत आहे. ज्या पद्धतीने हा समाज आमच्या पाठीशी आहे, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून मी स्वत: व या भागातील आमदार बाळू धानोरकर हेसुद्धा समाजाच्या पाठीशी आहेत. येथील खुल्या जागेवर बागेची निर्मिती करून सुशोभिकरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दिनेश एकोणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी ओंकार वसंता दैवलकर, प्रगती विनोद बन्सोड यांचा सत्कार करण्यात आला तर विविध स्पर्धेत विजय झालेले प्रियंका नीलेश जुनारकर, उज्वला नागपूरे, ऋतुजा लांडगे, ज्ञानेश्वर आंबीलकर, रेखा लांडगे, सोनी निंबाळकर, नूपुर देवईकर, पूजा कोंगरे आदींचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन रोहिनी घुमे, काजल येसेकर यांनी तर प्रास्ताविक अंकुश दर्वे, आभार विजय मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन नक्षिणे, भावराव दैवलकर, अजय वाटेकर, नंदू नक्षिणे, प्रकाश दैवलकर, सुरेश जमदाडे आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)