रूग्णांना खाटांसाठी आणखी सात दिवस पहावी लागणार वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:00 AM2021-04-17T05:00:00+5:302021-04-17T05:00:37+5:30

कोरोनाच्या उद्रेकामुळे काही दिवसांतच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात येताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना खाटा वाढविण्याचा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश  दिले. त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली. येत्या आठ दिवसांत १२७० खाटा उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

Patients will have to wait another seven days for beds | रूग्णांना खाटांसाठी आणखी सात दिवस पहावी लागणार वाट

रूग्णांना खाटांसाठी आणखी सात दिवस पहावी लागणार वाट

Next
ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा उद्रेक : १२७० नवीन खाटांसाठी प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर  : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने १२७० खाटा उपलब्ध करण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. वाढत्या रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यासाठी इमारती व हॉटेल ताब्यात घेणार आहे.
कोरोनाच्या उद्रेकामुळे काही दिवसांतच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात येताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना खाटा वाढविण्याचा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश  दिले. त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली. येत्या आठ दिवसांत १२७० खाटा उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
 

खासगी कोविड रुग्णालये फुल्ल

कोरोना रुग्णवाढ अत्यंत झपाट्याने होऊ लागली. त्यामुळे चंद्रपुरातील खासगी कोविड रुग्णालये फुल्ल झाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्राईस्ट, डॉ. गुलवाडे, डॉ. मानवटकर, श्वेता, डॉ. बुक्कावार, डॉ. नगराळे, गुरुकृपा, डॉ. मुरके, डॉ. पंत,  डॉ. पोटदुखे, कोतपल्लीवार, डॉ. दीक्षित, डॉ. वासाडे हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी खाटा शिल्लक राहिल्या नाही. ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर खाटांची तातडीने व्यवस्था करावी लागणार आहे.

महिला रुग्णालयात १०० पैकी २५ खाटा उपलब्ध
१२७० खाटांपैकी निम्म्यापेक्षा अधिक खाटा तर येत्या चार ते पाच दिवसांत उपलब्ध होतील, अशी तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. चंद्रपूर येथील महिला रुग्णालयात १०० पैकी २५ खाटा सुरू झाल्या आहेत. उर्वरित ७५ खाटा तत्काळ सुरू होतील. शिवाय, खाटांसाठी इमारती व हॉटेल ताब्यात येणार आहेत.

कोविड रुग्णांना वाचविण्यासाठी पायाभूत आरोग्य सुविधांसोबतच तातडीने  खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला रुग्णालय संपूर्ण क्षमतेने वापरण्यात येईल. रुग्णांना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाही, यासाठी यंत्रणा झटत             आहे.
 - अजय गुल्हाने,  
जिल्हाधिकारी, चंद्रपूर

 

Web Title: Patients will have to wait another seven days for beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.