कोरोनाच्या शोधात आढळले विविध आजारांचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:09+5:30

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ओळखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत एक सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात व कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

Patients with various ailments found in Corona's search | कोरोनाच्या शोधात आढळले विविध आजारांचे रुग्ण

कोरोनाच्या शोधात आढळले विविध आजारांचे रुग्ण

Next
ठळक मुद्देकर्करोगाचे ३१५ रुग्ण : जिल्ह्यात ९ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, आशा वर्कर, अंगणवाडी सेवकांच्या मार्फत कंटेनमेंट झोन व रुग्ण सापडलेल्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण नऊ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान कर्करोग, मधुमेह, ताप, फुफ्फुसाचे आजार, ह्दयरोग अशा विविध आजारांचे रुग्ण आढळले.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ओळखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत एक सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात व कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात बल्लारपूर तालुक्यातील ४२००, भद्रावती ६६४५६, ब्रह्मपुरी-६५८९, चंद्रपूर- २६४८५३, चिमूर-६०९६७, गोंडपिपरी-३७७११, जिवती-४०४२८, कोरपना-१०४१८८, मूल-५७५०१, नागभीड-७४७६४, पोंभूर्णा-३०२१०, राजुरा-६९६५०, सावली- ३२१०७, सिंदेवाही-४९३८० तर वरोरा तालुक्यातील ३२२२६ जणांची तपासणा करण्यात आली. तपासणीत जिल्हाभरात कर्करोगाचे ३१५ रुग्ण आढळून आले आहे. या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक ५३ कर्करुग्ण चंद्रपूर तालुक्यातील आढळले. त्यापाठोपाठ नागभीड (५०) व कोरपना तालुक्यात (४८) कर्करुग्ण आढळून आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दली.

कोरोना रूग्णात २१ ते ३० वयोगटातील अधिक
जिल्ह्यात २९ जूनच्या सकाळच्या अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ८७ रुग्णांमध्ये सर्वाधिक ३८ रुग्ण हे २१ ते ३० या वयोगटातील आहेत. ० ते २० वयोगटात दहा, ३१ ते ४० वयोगटात १८, ४१ ते ६० वयोगटात १६ व ६० वर्षांवरील पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एकूण रुग्णात पुरुष ५४ तर ३३ महिला पॉझिटिव्ह आढळल्या.

मधुमेहाचे ९१९३ रुग्ण
कोविड-१९ अंतर्गत आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्हाभरात आतापर्यंत नऊ हजार १९३ मधुमेहाचे रुग्ण आढळून आले. बल्लारपूर तालुक्यात ६३, भद्रावती-६८९, ब्रह्मपुरी-५८६, चंद्रपूर- ३०३९, चिमूर-६१७, गोंडपिपरी-२१७, जिवती-२०९, कोरपना-१३२६, मूल-३३६, नागभीड-४६५, पोंभूर्णा-१०६, राजुरा-२५७, सावली- २९०, सिंदेवाही-६७२ तर वरोरा तालुक्यात ३२३ मधुमेहाचे रुग्ण आढळले.

इतर आजारांचे रुग्ण
या सर्वेक्षणात जिल्हाभरात तापाचे १११८, सर्दीचे १४७५, श्वसनाचा त्रास ७४३, उच्च रक्तदाब २३१३५, फुफ्फुसाचा आजार १७८७, टीबी ४८३, ह्दयरोग १२१५ असे रुग्ण आढळून आले आहे.

Web Title: Patients with various ailments found in Corona's search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.