शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांतील रुग्णसंख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. परिणामी नागरिक घरातच स्वत:ची काळजी घेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बहुतांश खासगी रुग्णालये रुग्णांच्या प्रतिक्षेत आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : लॉकडाऊनमुळे नागरिक घेत आहे स्वत:ची काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घरातच स्वत:ची काळजी घेत स्वच्छतेकडे लक्ष देत आहे. त्यातच उद्योग, व्यापार बंद असल्याने पर्यावरण प्रदूषण कमी झाले आहे. परिणामी इतर दिवसांच्या तुलनेमध्ये सध्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. परिणामी नागरिक घरातच स्वत:ची काळजी घेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बहुतांश खासगी रुग्णालये रुग्णांच्या प्रतिक्षेत आहे. इतरवेळी ज्या खासगी रुग्णालयांमध्ये नंबर लावण्यासाठी दोन-दोन दिवसांचा कालावधी लागत होता. त्या रुग्णालयांमध्येही सध्या गर्दी कमी झाली आहे.अनेकवेळा बहुतांश नागरिक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी रुग्णालयामध्ये धाव घेतात. मात्र लॉकडाऊनंतर ते सुद्धा रुग्णालयात भटकताना दिसत नाही. एवढेच नाही तर अपघाताचे प्रमाणही कमी झाल्यामुळे या रुग्णलयामध्येही रुग्णसंख्या घटली आहे.नियमित तपासणी सुरूचलॉकडाऊननंतर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे सुरु केले आहे. परिणाम छोट्या-छोट्या आरोग्याच्या तक्रारी झपाट्याने कमी झाल्या आहे. त्यामुळे काही खासगी रुग्णालये ओस पडल्याची स्थिती आहे. दुसरीकडे गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी तज्ज्ञांकडे जात आहे.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नागरिक घरात आहेत. बाहेरील इतर पदार्थ खाणे बंद झाले आहे. काहींनी खाण्यापिण्याच्या सवईमध्ये बदल केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, लॉकडाऊन संपेपर्यंत घरीच थांबून सुरक्षितता बाळगावी.- निवृत्ती राठोडजिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल