शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

वर्गखोलीसाठी पालकांचा असाही लढा

By admin | Updated: July 3, 2014 23:31 IST

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नरत असतो. बनवाही (बिकली) येथील पालकांनाही असेच वाटत आहे. म्हणूनच गेल्या दोन वर्षापासून गावात वर्गखोल्या मिळाव्यात

नागभीड : आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नरत असतो. बनवाही (बिकली) येथील पालकांनाही असेच वाटत आहे. म्हणूनच गेल्या दोन वर्षापासून गावात वर्गखोल्या मिळाव्यात यासाठी ते लढा देत आहेत. पण त्यांच्या या लढ्याकडे लक्ष द्यायला कोणालाही सवड नाही.बनवाही साडेचारशे ते पाचशे लोकवस्तीचे गाव असून शासनाकडून चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी वर्ग जरी चार असले तरी वर्गखोली मात्र एकच आहे. येथे विद्यार्थीसंख्या ३२ असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. चारही वर्गाचे विद्यार्थी एकाच खोलीत बसून शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, ही वर्गखोली मोडकडीस आली असून पावसाने गळत आहे. एकाच खोलीत चारही वर्ग भरत असल्याने व गळत असल्याने शिक्षकांना शिकविण्यास आणि विद्यार्थ्यांना बसण्यास मोठी अडचण होत आहे. गावात वर्गखोली व्हावी यासाठी गावकऱ्यांचा गेल्या दोन वर्षापासून सतत पाठपुरावा सुरू आहे. त्या भागाच्या पं.स. सदस्य, जि.प. सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार या सर्वांना आतापयर्यंत निवेदने देऊन झाली. वस्तुस्थिती सांगून झाली. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान ३० जून रोजी गावकऱ्यांचे शिष्टमंडळ पुन्हा नागभीड येऊन निवेदन दिली. मागणी मान्य न झाल्यास आता शाळेलाच कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)