वैद्यकीय अधिकारीच पॉझिटिव्ह निघाल्याने शहरात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:01:01+5:30

वरोरा तालुक्यात कोरोनाचे रूग्ण बहुतांश बाहेर गावावरून आल्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या वरोरा शहर व ग्रामीण भागात ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. वरोरा शहरातील ट्रॉमा केअर युनिट येथे अ‍ॅन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केल्याने कोरोना रुग्णांचे अहवाल तातडीने मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी वरोरा शहरातील एका डॉक्टरला कोरोना सदृश्य लक्षणे आढळली होती.

Panic in the city as only the medical officer came out positive | वैद्यकीय अधिकारीच पॉझिटिव्ह निघाल्याने शहरात दहशत

वैद्यकीय अधिकारीच पॉझिटिव्ह निघाल्याने शहरात दहशत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. शहरातील वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव केला आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्याची चाचणी पॉझिटीव्ह निघाल्याने वरोरा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
वरोरा तालुक्यात कोरोनाचे रूग्ण बहुतांश बाहेर गावावरून आल्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या वरोरा शहर व ग्रामीण भागात ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. वरोरा शहरातील ट्रॉमा केअर युनिट येथे अ‍ॅन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केल्याने कोरोना रुग्णांचे अहवाल तातडीने मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी वरोरा शहरातील एका डॉक्टरला कोरोना सदृश्य लक्षणे आढळली होती. त्यांची अ‍ॅन्टिजन टेस्ट केली असत पॉझिटिव्ह निघाली. या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या रूग्णांची व कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. बाधित डॉक्टर हे एखाद्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना बाजारात होणारी गर्दी त्यातच काही शैक्षणिक संस्थांनी प्रवेश देण्याकरिता प्रवेश ऑनलाईन सुरू केले नाही त्यामुळे अशा अनेक प्रमाणात गर्दी दिसून येत. या ठिकाणी कुठलेही नियम कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखतांना पाळले जात नसल्याने अशा गर्दीवर अंकुश ठेवणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तालुक्यातील ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Panic in the city as only the medical officer came out positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.