मुथुट फायनान्सने वितरित केले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:08+5:302021-07-05T04:18:08+5:30

चंद्रपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुथुट फायनान्स लिमिटेडच्या स्थानिक शाखेच्या वतीने येथील जिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण ...

Oxygen Concentrator delivered by Muthoot Finance | मुथुट फायनान्सने वितरित केले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

मुथुट फायनान्सने वितरित केले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

चंद्रपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुथुट फायनान्स लिमिटेडच्या स्थानिक शाखेच्या वतीने येथील जिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण करण्यात आले.

सामाजिक जाणिवेतून आयोजित या उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात संपन्न एका छोटेखानी कार्यक्रमात चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांना हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. यावेळी महिला रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बंडू रामटेके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्नाके, मुथुट फायनान्सचे क्षेत्रीय व्यवस्थापक सिंग, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक मुरलीधर टोंगे, बल्लारपूर शाखा व्यवस्थापक राजीव फॉजदार, अश्विनी राजूरकर, सहायक व्यवस्थापक अनिमेष आदी उपस्थित होते.

मुथुट फायनान्सचे संस्थापक अध्यक्ष स्व. एम जी जॉर्ज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कंपनीतर्फे कोरोनाच्या या संकटकाळी सामाजिक जवाबदारीचे भान ओळखून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला मदत करण्याचा उद्देशाने विविध रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप केले जात आहे. कोरोनाकाळात कंपनीतर्फे मागील वर्षीदेखील गरजवंतांना भोजनाची पाकिटे वितरित करण्यात आली होती.

Web Title: Oxygen Concentrator delivered by Muthoot Finance