१४ लाखांवर जनावरांना डोअर टू डोअर देणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:50+5:30

साईनाथ कुचनकार। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध प्रजातीतील जनावरांना लसीकरण ...

Over 14 lakh animals will be vaccinated door to door | १४ लाखांवर जनावरांना डोअर टू डोअर देणार लस

१४ लाखांवर जनावरांना डोअर टू डोअर देणार लस

Next
ठळक मुद्देकोरोनाचा लसीकरणालाही फटका : फिजिकल डिस्टन्स ठेवून मोहीम सुरू

साईनाथ कुचनकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध प्रजातीतील जनावरांना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १४ लाख ३१ हजार पशुधनाला लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गावागावत शिबिरे न घेताच लसीकरण करण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांपासून तापमान वाढले आहे. या तापमानाचा परिणाम पशुधनावरही होत आहे. त्यामुळे पशुधनाचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागाने घेतली असून लसीकरणाच्या माध्यमातून आरोग्य जपणे सुरू केले आहे. जिल्ह्यात १४ लाख ३१ हजार ६८६ च्यावर पशुधन आहे.
त्यामुळे प्रत्येकांपर्यंत पोहचणे पशुसंवर्धन विभागाला कठीण जात असले तरी पशुपर्यवेक्षक तसेच सहाय्यकांच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अशी घ्या काळजी
पशुधनाला लाळ खुरकत रोग झाल्यास पशुपालकांनी पोटॅशियम परमॅग्नेटच्या अथवा तुरटीच्या पाण्याने दिवसातून तिनवेळा पशुधनाचे तोंड स्वच्छ धुवावे. त्यावर बोरॅक्स व ग्लिसरीन लावावे. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधे द्यावी.

लसीकरण सुरू
उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता लालखुळकत, घटसर्प, एकटांग्या, शेळ्यांमधील आंतविशाद, लसीकरण, कोंबड्यामध्ये मानमोडी आदींवर ललीकरण सुरू करण्यात आली आहे.

लाळ- खुरकत झाल्यास
जनावरांना लाळ खुरकत आजार झाल्यास पशुधनचारा खाणे, पाणी पिणे बंद करणे, तसेच तोंडातून लाळ गळणे, जिभेला चट्टे पडणे, पायाच्या खुतात जखमा होणे, पशुधन लंगडणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लस देणे महत्त्वाचे आहे.

दरवर्षी गावागावांत शिबिरे घेऊन लसीकरण केले जात होते. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी गावागावांत घरोघरी जाणून पशुंना लसीकरण करीत आहेत. सध्यातरी जिल्ह्यात पशुंवर कोणताही संसर्गजन्य आजार नाही. तरीही प्रत्येक पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची योग्य काळजी घ्यावी.
-डॉ. अविनाश सोमनाथे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर

Web Title: Over 14 lakh animals will be vaccinated door to door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.