शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

गाईड संपावर ठाम जिप्सीमालक बाहेर

By admin | Updated: May 13, 2017 00:27 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करणाऱ्या गाईडनी शासकीय सेवेमध्ये घेण्याची मागणी ....

ताडोबा व्याघ्र प्रकल्प : आजपासून आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करणाऱ्या गाईडनी शासकीय सेवेमध्ये घेण्याची मागणी करीत १३ मे रोजीपासून संप पुकारला आहे. या संपावर गाईड ठाम असून त्यांचा सहकार्य करण्याचा निर्णय घेणाऱ्या जिप्सी मालकांनी मात्र शुक्रवारी संपातून माघार घेतली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (कोर) उपसंचालक डॉ. किशोर मानकर यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या सर्वच पर्यटकांना ताडोबा प्रकल्पाची माहिती नसते. देश-विदेशातील पर्यटकांना जंगलात पर्यटन करताना ताडोबातील गाईड मार्गदर्शन करीत असतात. ताडोबामध्ये अंदाजे २०० गाईड काम करीत आहेत. त्यांना कामाच्या बदल्यात पर्यटकांकडून मोबदला मिळत असतो. त्यांचे काम मुख्यत्वे पर्यटनाच्या काळात चालत असते. उर्वरित काळात त्यांना गाईडचा रोजगार मिळत नाही.या गाईडनी शासनाकडून मानधन मिळण्याची मागणी करीत १३ व १४ मे रोजी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. गाईडच्या मागण्यांना पाठिंबा देत जिप्सी इको टुरिस्ट वेल्फेअर सोसायटी या जिप्सी मालकांच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. पर्यटकांना जिप्सी जंगलाची सफर घडवित असतात. जिप्सी मालकही संपात सहभागी होणार असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. गाईड आणि जिप्सीमालक संपावर गेले असते तर पर्यटकांना त्रास सहन करावा लागला असता. परंतु जिप्सी संघटना शुक्रवारी संपातून बाहेर पडली आहे.जिप्सी भाडेवाढीचा प्रस्ताव पाठविणारताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (कोर) उपसंचालक डॉ. किशोर मानकर यांच्या कार्यालयात जिप्सी इको टुरिस्ट वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संपाबाबत शुक्रवारी दुपारी चर्चा केली. त्यामध्ये जिप्सी भाडेवाढ करण्यात यावी, जंगलात जाणाऱ्या जिप्सी चालकांचा विमा काढण्यात यावा, वन रस्ते दुरूस्त करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये जिप्सी भाडेवाढीचा प्रस्ताव समितीकडे पाठविण्यास उपसंचालक डॉ. मानकर यांनी तत्वत: मान्यता दिली. तर जंगलातील वन रस्ते दुरूस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले. दोन मागण्यांवर सहमती झाल्याचे जिप्सी इको टुरिस्ट वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष संजय मानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.