शहरं
Join us  
Trending Stories
1
जी-७ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी इटलीला रवाना, जॉर्जिओ मेलोनी यांची घेणार भेट!
2
WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर; यजमानांचा झंझावात
3
वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉ. संजीव ठाकूर पुन्हा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होणार!
4
‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता
5
'आमचा विरोध नाही, पण...'! UCC संदर्भात JDU नेत्याचं विधान, भाजपचं टेन्शन वाढणार
6
पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार?
7
महिलांना ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर, जगन्नाथ मंदिरासाठी ५०० कोटी; ओडिशाच्या माझी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमधील निर्णय
8
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२४ : घरात सुखशांती नांदेल, शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील
9
ऐतिहासिक! रोहितने गांगुलीची 'दादा'गिरी संपवली; असं करणारा ठरला पहिला भारतीय कर्णधार
10
पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; छावण्या, रेल्वेवर हल्ल्याची भीती, लष्कर सतर्क
11
कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक करण जोहरची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्या प्रकारच्या"
12
WI vs NZ : ६ षटकार! न्यूझीलंडचा सांघिक खेळ; पण वेस्ट इंडिजकडून एकट्याने किल्ला लढवला
13
अकरावी-बारावीसाठी हजार रुपये, तर पदव्युत्तरसाठी मुलींना २,५०० रुपये, आसाम सरकार देणार विद्यावेतन
14
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी
15
अवघ्या पाच महिन्यांत क्रॅक केली चौथी पोस्ट! हॅट्ट्रिक झाली, आता नम्रताचा चौकार!
16
सूड उगविण्यासाठी अभिनेत्रीनेच केले प्रवृत्त, अश्लील कमेंटमुळे दर्शन चिडला अन्..., धक्कादायक गौप्यस्फोट
17
पुरुषांना १०० तर महिलांना ४० रुपये! वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारतातील वेतनाची स्थिती आली समाेर
18
विश्वचषक पात्रता स्पर्धा; ‘त्या’ वादग्रस्त गोलची चौकशी करा! भारतीय फुटबॉल महासंघाची मागणी
19
दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी, आभूषणे आणण्यासाठी घ्यावी लागणार केंद्र सरकारची परवानगी
20
पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, २०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षणातील निष्कर्ष

४0 लाखांच्या बियाण्यांवर बंदीचे आदेश

By admin | Published: June 08, 2014 11:48 PM

नियमानुसार खते व बियाण्यांची विक्री न करणार्‍या जिल्ह्यातील कृषी केंद्राची कृषी विभागाच्या पथकाने पहाणी केली यात अनियमितता आढळून आल्याने ४0 लाख रुपयांच्या बियाण्यांवर विक्रीबंदीचे आदेश देण्यात

कृषी विभागाची कारवाई : धाडसत्र सुरु, कृषी संचालक धास्तावलेचंद्रपूर : नियमानुसार खते व बियाण्यांची विक्री न करणार्‍या जिल्ह्यातील कृषी केंद्राची कृषी विभागाच्या पथकाने पहाणी केली यात  अनियमितता आढळून आल्याने ४0 लाख रुपयांच्या बियाण्यांवर विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यात कापूस १७ लाख ७ हजार ४५0 रुपये, सोयाबीन १४ लाख २५ हजार ८४0, धान ८ लाख २ हजार ७८ रुपये, तर जैविक कीटकनाशक २८ हजार ८00 रुपयांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे  विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. पेरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग वाढली. बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांची कृषी केंद्रांमध्ये झुंबड उडत आहे. नेमकी हिच संधी साधून जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांनी अनाधिकृतपणे बियाणे विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. तसेच उगम प्रमाणपत्र नसणे, कृषी आयुक्तालयाकडून परवानगी न घेता बियाण्यांची विक्री करणे, बियाण्यांची माहिती  न कळविणे असा ठपका ठेवत कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भरारी पथकाचे गठण केले आहे.  तपासणीदरम्यान जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, भद्रावती, वरोरा, टेमुर्डा, गडचांदूर, नागभीड, अहेरी आणि शेगाव येथील कृषिकेंद्रांतून ४0 लाख रुपयांच्या कापूस, सोयाबीन आणि धान बियाण्यांवर विक्रीबंदी घातली आहे. ( नगर प्रतिनिधी)