शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव आरोग्य केंद्रात दोन वेळात ओपीडी

By admin | Updated: December 15, 2014 22:53 IST

तालुक्यातील शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी कित्येक वर्षापासून होती, ही मागणी मंजुर झाली. परंतु बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दिवसात एकच वेळ घेण्यात येत होती.

आरोग्य मंत्र्याचे आदेश : यंत्रणा कामाला लागलीवरोरा : तालुक्यातील शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी कित्येक वर्षापासून होती, ही मागणी मंजुर झाली. परंतु बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दिवसात एकच वेळ घेण्यात येत होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत होता. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत होईल तेव्हा होईल, परंतु येत्या आठ दिवसात सोपस्कर पूर्ण करून शेगाव आरोग्य केंद्रात दोन्ही वेळची ओपीडी सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी वरोरा दौऱ्यावर असताना आरोग्य विभागास दिले आहे.वरोरा तालुक्यातील शेगाव गावामध्ये मोठी बाजारपेठ असुन २० ते २५ गावाचा शेगाव गावाशी नेहमी संपर्क येतो. नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून नागरीक करीत होते. वाढती लोकसंख्या व आजारामुळे तसेच वरोरा-चिमूर मार्गावरील अपघातग्रस्तांना सेवा आरोग्य यंत्रणा अपुरी पडत होती. परिणामी जखमींना नाहक त्रास करावा लागत होता. शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाने मंजुरी देत इमारत बांधकामालाही मंजुरी दिली आहे. नव्याने होणाऱ्या प्राथमिक स्वास्थ केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचे १७ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे या आरोग्य उपकेंद्रात एकच वेळ ओपीडी घेण्यात येत असल्याने बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याची बाब आमदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या निदर्शनास वरोरा भेटीदरम्यान आणून दिली. त्यावेळी तातडीने सोपस्कर पूर्ण करून येत्या आठ दिवसात शेगाव येथे दोन्ही वेळ ओपीडी घेण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहे. यासोबतच इमारतीचे बांधकाम व वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)