ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे ज्येष्ठ नागरिक झाले हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:29 IST2021-05-06T04:29:48+5:302021-05-06T04:29:48+5:30

फोटो विसापूर : शासनाने कोविड प्रतिबंध लस जवळपासच्या कोणत्याही केंद्रावर घेण्याची मुभा दिल्याने चंद्रपूर-बल्लारपूर शहरातील नागरिक ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून ...

Online registration has made senior citizens vulnerable | ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे ज्येष्ठ नागरिक झाले हतबल

ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे ज्येष्ठ नागरिक झाले हतबल

फोटो

विसापूर : शासनाने कोविड प्रतिबंध लस जवळपासच्या कोणत्याही केंद्रावर घेण्याची मुभा दिल्याने चंद्रपूर-बल्लारपूर शहरातील नागरिक ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून विसापूर केंद्राची निवड करीत असल्याने स्थानिक नागरिकांना व ज्येष्ठांना लस घेणे अडचणीचे झाले आहे.

मागील दोन महिन्यांपासून विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविड प्रतिबंध लसीकरण करण्यात येत आहे. त्यापैकी बरेच नागरिक दुसरा डोज घेण्यासाठी केंद्रावर येत आहेत; परंतु बल्लारपूर व चंद्रपूरचे नागरिक येथे लस घेण्यासाठी येत असल्यामुळे स्थानिक विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे आता अडचणीचे झाले आहे. कारण ते लसीचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना विसापूर केंद्राची निवड करीत असल्याने त्यांच्या नावाने लस आरक्षित झाल्याने प्रथम त्यांना देण्यात येत आहे व उर्वरित लस स्थानिकांना देण्यात येत असल्यामुळे यामध्ये असंख्य ज्येष्ठ नागरिकांना अँड्रॉइड मोबाइल हाताळता येत नसल्यामुळे लोकेशन ट्रेस करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे

केंद्रावरून त्यांना परत जावे लागत आहे. या कारणाने त्यांच्यात कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. पूर्वी केंद्रावर त्यांच्या नावाचे रजिस्ट्रेशन करून दिले जात होते; परंतु आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लस कशी घ्यावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.

शासनाने स्थानिक पातळीवर याबाबत उपाययोजना करून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Online registration has made senior citizens vulnerable