अधिकाऱ्यांनी अभ्यास करूनच आमसभेला उपस्थित यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:50+5:30

शासनाकडून योजनांसाठी निधी किती प्राप्त झाला. त्यातला खर्च किती झाला, शिल्लक कामे किती याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असली पाहिजे. बैठकीत सदर माहिती सोबतच घेऊनच उपस्थित राहावे, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत दिल्या.

The officers should attend the assembly only after studying | अधिकाऱ्यांनी अभ्यास करूनच आमसभेला उपस्थित यावे

अधिकाऱ्यांनी अभ्यास करूनच आमसभेला उपस्थित यावे

Next
ठळक मुद्देप्रतिभा धानोरकर : पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शासनाकडून योजनांसाठी निधी किती प्राप्त झाला. त्यातला खर्च किती झाला, शिल्लक कामे किती याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असली पाहिजे. बैठकीत सदर माहिती सोबतच घेऊनच उपस्थित राहावे, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत दिल्या.
यावेळी पं. स. उपसभापती प्रविण ठेंगणे, तहसीलदार महेश शितोळे, जि. प. सदस्य यशवंत वाघ, बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, पं. स. माजी सभापती विद्या कांबळे, माजी उपसभापती नागोबा बहादे, सदस्य चिंतामन आत्राम, संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, गटशिक्षणाधिकारी मंगेश आरेवार, महेश टोंगे उपस्थित होते. पांदण रस्ते घरकूल, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना व बांधकाम विभागाची प्रलंबित कामे सोडविण्याच्या सूचना आमदार धानोरकर यांनी दिल्या. कुचनाच्या सरपंच वर्षा ठाकरे, मांगलीचे काळे, उपसरपंच तेलंग, भराळीचे उपसरपंच रोहणकर, चालबर्डीचे सरपंच मडावी, भास्कर ताजणे यांनी समस्या मांडल्या. संचालन कराडे यांनी केले. आभार धनपाल फटिंग यांनी मानले.

अंगवाडीसेविकांची पदे रिक्त
तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रात सेविका व मदतनिसांच्या जागा रिक्त आहेत. चालबर्डी (कोंढा) येथे अंगणवाडीसेविका नसल्याने काही पोषण आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. माजरी येथील जि. प. शाळेला इमारत नाही. पिरली, फराळा येथे मदतनिस शिकवित असल्याच्या तक्रारी आमसभेत पुढे आहे.

पाच गावे घरकूल योजनेपासून वंचित
तालुक्यातील ढोरवासा मांगली रै कुनाडा, चिरादेवी, टाकळी या ग्रामपंचायतींच्या घरकूल याद्या गेल्या पाच वर्षांपासून आॅनलाईन झाल्या नाही. त्यामुळे या गावांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकूल व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही.
पांदण रस्त्यांचा अभाव
शिवरस्त्यासाठी सुमारे ३०० तक्रारी आल्या. त्यामुळे येत्या ४ ते ५ वर्षांत पांदण रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही आमदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी दिली.
 

Web Title: The officers should attend the assembly only after studying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.